मालेगाव, येवला येथे राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा

By Admin | Published: October 31, 2014 10:30 PM2014-10-31T22:30:06+5:302014-10-31T22:30:18+5:30

मालेगाव, येवला येथे राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा

Celebrated National Integration Day at Malegaon, Yeola | मालेगाव, येवला येथे राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा

मालेगाव, येवला येथे राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा

googlenewsNext

मालेगाव : शहर, तालुक्यातील विविध शाळा- महाविद्यालयामध्ये भारताचे प्रथम गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरी करण्यात आली. तसेच माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या निमित्ताने दोघा राष्ट्रनेत्यांना आदरांजली वाहण्यात आली.
केबीएच विद्यालय, मुंगसे
येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरिष्ठ लिपिक भाऊसाहेब पानपाटील होते. शिक्षकांची भाषणे झाली. यावेळी जी. एन. सोनार, आर. ए. पवार यांचेसह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
केबीएच विद्यालय, मळगाव (ना.)
येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक यू.व्ही. अहिरे होते. शिक्षकांची भाषणे झाली. यावेळी एस. ए. पवार, के. व्ही. ठोमरे यांच्यासह सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
म्युनिसिपल हायस्कूल, मालेगाव
येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सी. एस. दुसाने होते. यानिमित्ताने शाळा परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी पर्यवेक्षक के. वाय. पगार, बी. जे. देवरे, एम. एस. भदाणे, जे. ए. शेलार यांचेसह सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
केबीएच विद्यालय, कॅम्प
येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य लिपिक बी. आर. घरटे होते. उपस्थिांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देण्यात आली. ज्येष्ठ शिक्षक ई. एल. देसले व एस. डी. वाघ यांनी अनुक्रमे सरदार पटेल व श्रीमती इंदिरा गांधी यांच्या जीवन कार्याची माहिती सांगितली. यावेळी प्राचार्य पी. आर. पाटील, वाय. आर. पवार, एस. डी. बागड, एच. बी. देवरे, एस. बी. चव्हाण, आर. आर. नरवडे, संजय सूर्यवंशी, प्रमोद पिंपळसे आदि उपस्थित होते.
जागृती विद्यालय, सोयगाव
येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक राहुल मोराणकर होते. उपस्थितांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली. यावेळी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
श्री. र. वी. शाह विद्यालय, संगमेश्वर
येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक ललित तिळवणकर होते. उपस्थितांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली. यावेळी मुख्याध्यापक एस. डी. बेलन, बी. एस. पाटील, सुरेश पाटील, बाळू हाडस आदि उपस्थित होते. वंदेमातरम् गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
हिरे औषधनिर्माणशास्त्र
महाविद्यालय मालेगाव कॅम्प
येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सतीश कलंत्री होते. प्राचार्य संतोष तांबे यांनी राष्ट्रीय एकात्मता दिवसाची माहिती दिली. यावेळी प्राध्यापक शाहीद कुरेशी, प्रा. जयेश मुसळे, प्रा. राकेश अमृतकर, विनोद पाटील, प्रा. किरण अहिरे आदि उपस्थित होते.
दौलती इंग्लिश स्कूल
येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष देवीदास बच्छाव होते. शिक्षकांची भाषणे झाली. यावेळी सौ. कमल बच्छाव, सचिन बच्छाव, मुख्याध्यापिका स्मिता आहेर, वंदना बच्छाव आदि उपस्थित होते.
हिंद सम्राट संस्था
संस्थेतर्फे राष्ट्रीय एकता दिन व एकता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष विनोद जाधव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी भटू म्हसदे, संदीप उशीरे, नीलेश गोसावी, धनंजय पवार, वैशाली ठाकरे, प्रिया जाधव, मीना गायकवाड, प्रतिक्षा शेवाळे आदि उपस्थित होते.
मसगा महाविद्यालय, कॅम्प
येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुभाष निकम होते. उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देण्यात आली. यावेळी उपप्राचार्य डॉ. रवि देवरे, डॉ. आर. एम. शिरसाठ यांच्यासह शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
येवला शहरात कार्यक्रम
येवला : शहरात विविध ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली. राष्ट्रीय एकता दिवस म्हणून विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.युवा कार्यक्र म व क्र ीडा मंत्रालय, नेहरू युवा केंद्र व स्वयंसेवी संस्था खटपट युवा मंच यांच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून शिंपी गल्ली कॉर्नर येथे साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी पंकज पारख होते. प्रारंभी मुकेश लचके यांनी प्रास्ताविक केले. लोहपुरूष सरदार पटेल यांनी देशातील बहुतांशी संस्थाने खालसा करून अखंड भारताचे स्वप्न कार्यान्वित केले. देश हितासाठी कणखर भूमिका घेणारे लोहपुरुष सरदार पटेल यांच्या आदर्शावर चालण्याची गरज वक्त्यांनी प्रतिपादित केली. ज्ञानेश टिभे यांनी आभार मानले. यावेळी प्रा.दत्तात्रय नागडेकर, माणिकराव शर्मा, अनिल कुक्कर, अरुण येवले, संजय गायकवाड, मधुसूदन शिंदे, बाळू गायकवाड, प्रभाकर अहिरे, गोपाळ गुरगुडे, सीताराम भांबारे , राम तुपसाखरे, पवन भडांगे, केरू तुपसैदर, श्रीकांत खंदारे आदिसह कार्यकर्ते उपस्थित होते.
नगर परिषद कार्यालय
सरदार वल्लभभाई पटेल जयंती व इंदिरा गांधी पुण्यतिथी कार्यक्रम येवला नगर परिषदेमध्ये साजरा करण्यात आला. नगराध्यक्ष शबाना बानो शेख यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदराजंली वाहण्यात आली. या प्रसंगी ‘राष्ट्रीय एकता दिवस ‘ शपथ घेण्यात आली. नगर परिषदेचे कर्मचारी, अधिकारी यांना पांडुरंग मांडवडकर यांनी शपथ दिली. याप्रसंगी उपमुख्याधिकारी आर.आर.शेख व नगर परिषदेचे सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते. (लोकमत चमू)

Web Title: Celebrated National Integration Day at Malegaon, Yeola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.