सिन्नर महाविद्यालयात ‘पराक्रम पर्व दिन’ साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 05:43 PM2018-10-01T17:43:23+5:302018-10-01T17:45:10+5:30
सिन्नर महाविद्यालयात छात्रसेना विभागाच्या वतीने पराक्रम पर्वदिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय सैन्य दलातर्फे २०१६ साली करण्यात आलेल्या सर्जीकल स्ट्राईकच्या माध्यमातून दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले होते. विक्रमी वेळेत शिस्तबध्दपणे पार पडलेल्या मोहिमेत भारतीय सैन्याला मोठे यश मिळाले. यासाठी सर्व स्तरातून सैन्य दलावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला होता. सैन्याच्या याच कर्तुत्व शिस्त आणि शौर्याचे नागरिकांना स्मरण व्हावे यासाठीच या पर्वाचे आयोजन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर सिन्नर महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेना विभागाद्वारे २९ सप्टेंबर २०१८ रोजी ‘पराक्र म पर्व दिन’ साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त सैनिक बाळू जायभावे, सात महाराष्ट्र बटालियनचे सुभेदार पवन कुमार, प्राचार्य श्रीमती जे. डी. सोनखासकर, उपप्राचार्य आर. व्ही. पवार, एन. सी. सी. प्रमुख यु. ए. पठाडे, देवळाली कॅम्प महाववद्यालायचे एन. सी. सी. प्रमुख व्ही. सी. बडवर आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते. जायभावे यांनी छात्रांना पराक्र म पर्व दिन साजरा करण्याचे महत्व पटवून दिले. सर्जीकल स्ट्राईक या लष्करी कारवाई मध्ये घेण्यात आलेल्या युद्ध नितीचे विवेचन त्यांनी यावेळी केले. लष्कराच्या स्पेशल फोर्सचे पॅरा कमांडोज सर्जीकल स्ट्राईकची कामगिरी पार पाडतात. यासाठी त्यांना विशिष्ट प्रशिक्षण देण्यात येते असे मत सुभेदार पवन कुमार यांनी व्यक्त केले. सोनखासकर यांनी यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांनी परेड करून पथसंचलन केले. पठाडे यांनी चित्रफितीच्या माध्यमातून सर्जीकल स्ट्राईक या लष्करी कारवाईची माहिती उपस्थितांना दिली. या कार्यक्रमासाठी सात महाराष्ट्र बटालियन नाशिकचे कर्नल कुशवाह, लेफ्टनंट कर्नल सतीश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. स्वाती कानवडे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास छात्रभारती सेनेचे विद्यार्थी, विद्यार्थीनी, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.