‘रासक्रीडा उत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा
By Admin | Published: October 10, 2014 12:24 AM2014-10-10T00:24:05+5:302014-10-12T00:50:53+5:30
‘रासक्रीडा उत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा
नामपूर : गोपालकृष्ण भगवान की जय, ‘उद्धव महाराज की जय’, बालाजी भगवान की जय आदिंच्या नामघोषात रासचक्र स्तंभावर चढवून ‘रासक्रीडा उत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.श्रीकृष्ण-राधिका यांच्या निस्सीम प्रेमाचे प्रतीक असलेल्या रासक्रीडा उत्सवास हिंदू धर्म संस्कृतीत अनन्य साधारण महत्त्व आहे. भारतात मथुरा, मुल्हेर आणि नामपूर अशा तीन ठिकाणी कोजागरी पौर्णिमेला रासक्रीडा उत्सव साजरा केला जातो. येथील रासक्रीडा उत्सवास सुमारे २०० वर्षांची वैभवशाली परंपरा आहे. सामाजिक कार्यकर्ते (कै.) नथुदास वैष्णव यांनी नामपूर गावात रासक्रीडा उत्सवाची मुहूर्तवेढ रोवली. येथील योगायोग चौकातील बालाजी मंदिरात अखंडपणे उत्सवाची परंपरा सुरू असून, वैष्णव समाज बांधवांकडून कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले जाते.