मालेगवी महवीर जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 19:18 IST2020-04-06T19:14:26+5:302020-04-06T19:18:11+5:30

मालेगाव कॅम्प : मालेगावी जैन श्वेतंबर मुर्ती पुजक संघ तसेच आदी सकल जैन समाजातर्फे शहरातील विविध जैन मंदिरात साधेपणाने मोजक्या सदस्यांतर्फे महावीर जयंती उत्सव साजरा करण्यात आला .

Celebrating the birth anniversary of Malegavi Mahavir | मालेगवी महवीर जयंती साजरी

मालेगावी महावीर जयंती निमित्त संघवी फाऊंडेशनतर्फे धान्य वाटप प्रसंगी दादा भूसे,अमीत संघवी, निखील बुुरड आदी.

ठळक मुद्देसोयगाव बाजार येथे कृषीमंत्री यांच्या हस्ते शिधा वाटप

मालेगाव कॅम्प : मालेगावी जैन श्वेतंबर मुर्ती पुजक संघ तसेच आदी सकल जैन समाजातर्फे शहरातील विविध जैन मंदिरात साधेपणाने मोजक्या सदस्यांतर्फे महावीर जयंती उत्सव साजरा करण्यात आला .
शहरातील जैन मंदिरात मोजक्याच सदस्यांनी मंदीर परिसरात भगवान श्री महावीर यांच्या जन्म कल्याणक निमित्त पूजन केले. मंदिरात थाळी नाद केला. त्यानंतर मंदिराचे धर्मगुरुंनी छोटेखानी प्रवचन दिले. त्यानंतर मंदिरात विश्वस्ततर्फे गोर गरीबांना सामाजिक अंतर राखत धान्य वाटप करण्यात आले. दुपारी, सायंकाळी व रात्री मंदिरा बाहेर आरती करण्यात आली. तसेच महावीर जयंती निमित्त संघवी फाऊंडेशन व हेल्पींग हैण्ड यांच्या संयुक्त विद्यमाने सुमारे ५००हून अधिक गरजू व गरीब नागरिकांना सोयगाव बाजार येथे कृषीमंत्री यांच्या हस्ते शिधा वाटप करण्यात आला. त्या प्रसंगी फाऊंडेशनचे अमीत संघवी निखील बुरु ड आदींसह सदस्य उपस्थित होते. तसेच वर्धमान नगर येथील कार्यक्रमाप्रसंगी जैन मंदीर येथे मुकेश शहा, संतोष नानावटी, उमेश शहा आदी उपस्थित होते.
 

Web Title: Celebrating the birth anniversary of Malegavi Mahavir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.