त्र्यंबकला मौनी अमावास्येनिमित्त विविध साधू-महंत तसेच आखाडा परिषदेच्या साधूंकडून कुशावर्तात पर्वस्नान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:08 AM2018-01-17T00:08:13+5:302018-01-17T00:19:28+5:30

त्र्यंबकेश्वर : मौनी अमावास्येनिमित्त विविध साधू-महंत तसेच आखाडा परिषदेच्या पदाधिकाºयांनी पर्व स्नान केले. गुरुवारपासून (दि.१८) गंगादशहरा सुरू होत असून, यानिमित्त विश्वकल्याण प्रार्थना करण्यात आली.

Celebrating the festival of Mausoleum, various monasteries and monasteries from the Akhada Parishad celebrated Kushvarna | त्र्यंबकला मौनी अमावास्येनिमित्त विविध साधू-महंत तसेच आखाडा परिषदेच्या साधूंकडून कुशावर्तात पर्वस्नान

त्र्यंबकला मौनी अमावास्येनिमित्त विविध साधू-महंत तसेच आखाडा परिषदेच्या साधूंकडून कुशावर्तात पर्वस्नान

googlenewsNext
ठळक मुद्दे२०१९ मध्ये प्रयागराज कुंभमेळा देवदर्शनाबरोबर साधू-महंतांचे दर्शन

त्र्यंबकेश्वर : मौनी अमावास्येनिमित्त मंगळवारी येथील विविध साधू-महंत तसेच आखाडा परिषदेच्या पदाधिकाºयांनी एकत्र पर्व स्नान केले. गुरुवारपासून (दि.१८) गंगादशहरा सुरू होत असून, यानिमित्त विश्वकल्याण प्रार्थना करण्यात आली. अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री हरिगिरी महाराज, आखाडा परिषदेचे अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती यांच्या मार्गदर्शनाखाली हे पर्वस्नान उत्साहात झाले. जवळपास शंभर साधू यात सहभागी झाले होते. गंगा पूजनाचा संकल्प त्रिविक्र म शास्त्री जोशी यांनी केला. सध्या इलहाबाद, प्रयागराज येथे माघ मास मेळा सुरू आहे. तेथे भाविक व साधू स्नान करतात. २०१९ मध्ये प्रयागराज कुंभमेळा आहे. वरील ठिकाणीही कुंभ पर्व यशस्वी व्हावा या करिता प्रार्थना करण्यात आली. दरवर्षी स्थानिक साधू असे पर्वस्नान करतील, अशी परंपरा निर्माण करतील. यातून कुंभमेळा महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वरला भरतो हा संदेश भाविकांत जाईल, असे महामंत्री हरिगिरी महाराज यांनी सांगितले.
ज्योतिर्लिंगाचे दर्शन
निलपर्वतावर श्री पंच दशनाम जुना आखाडा येथे सर्व महंतांची बैठक होऊन दि.२७ ला गोदावरी जन्मोत्सव सोहळा लक्षात घेऊन गोदावरी शुद्धीकरण मोहीम तसेच हरित ब्रह्मगिरी मोहीम शासनाने हाती घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी आनंद आखाड्याचे शंकरानंद सरस्वती, अग्नि आखाड्याचे अभयानंद ब्रह्मचारी, महानिर्वानी महंत कमलेशगिरी भारती, आवाहन आखाड्याचे आनंद पुरी, नया उदासी आखाड्याचे महंत विचारदास आदी ठाणपती पुजारी सामील होते. कुशावर्तावर स्नानानंतर सर्व साधूंनी त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेतले. यावेळी भाविकांनी देवदर्शनाबरोबर साधू-महंतांचे दर्शन घेतले.

Web Title: Celebrating the festival of Mausoleum, various monasteries and monasteries from the Akhada Parishad celebrated Kushvarna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक