ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयात विश्वशांती दिवस साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:14 AM2021-01-23T04:14:55+5:302021-01-23T04:14:55+5:30
पहाटे ब्राह्ममुहूर्तावर विश्वातील सर्व सेवा केंद्रांतील साधकांनी राजयोग मेडिटेशन अभ्यास केला. सकाळी ७ ते ९ ईश्वर महावाक्यांचे चिंतनपठण ...
पहाटे ब्राह्ममुहूर्तावर विश्वातील सर्व सेवा केंद्रांतील साधकांनी राजयोग मेडिटेशन अभ्यास केला. सकाळी ७ ते ९ ईश्वर महावाक्यांचे चिंतनपठण करण्यात आले. यात ब्रह्माबाबांच्या दिव्य कार्याचा आढावा घेऊन त्यांच्या दिव्य शिकवणीला स्मृतीद्वारे उजाळा देण्यात आला. मेरी म्हसरूळ मुख्यालय क्षेत्रीय मुख्य प्रशासक राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंतीदीदी यांनी यावेळी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, ब्रह्माबाबांनी साधकांच्या मनात आध्यात्मिकतेची बीजे रोवली व जीवनात विश्वशांतीसाठी तसेच नवमूल्ययुक्त समाजनिर्मितीसाठी आपल्याला जी शिकवण दिली आहे, त्याचा मागोवा घेऊन आपल्याला पुढे वाटचाल करायची आहे. यावेळी नाशिक उपक्षेत्र सेवा केंद्र संलग्न असलेले गंगापूर रोड, सिडको, पंचवटी, नाशिक रोड, देवळाली कॅम्प, त्रिमूर्ती चौक, पिंपळगाव, वणी, कोपरगाव, येवला सेवा केंद्रे उपसेवा केंद्रात राजयोग मेडिटेशनचा कार्यक्रम करण्यात आला.