नांदूरशिंगोटे येथे यात्रोत्सव उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 11:47 PM2019-12-29T23:47:55+5:302019-12-29T23:48:21+5:30
सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे गावाचे आराध्य दैवत श्री रेणुकामाता यात्रोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. तीन दिवस चालणाऱ्या यात्रेत विविध धार्मिक कार्यक्र म पार पडले. हजारो भाविकांनी यात्रेस हजेरी लावली.
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे गावाचे आराध्य दैवत श्री रेणुकामाता यात्रोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. तीन दिवस चालणाऱ्या यात्रेत विविध धार्मिक कार्यक्र म पार पडले. हजारो भाविकांनी यात्रेस हजेरी लावली.
नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील नांदूरशिंगोटे गावाचे आराध्यदैवत असणारे श्री रेणुकामाता परिसरातील जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. पौष शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी म्हणजे शुक्र वारी यात्रेस प्रारंभ झाला. यात्रोत्सव समितीच्या वतीने मंदिर परिसरात सुशोभीकरण आणि मंदिरसंकुलावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. प्रामुख्याने मंदिर संकुलात असणाºया रेणुकामाता मंदिरासह विठ्ठल रुक्मिणी, श्री दत्त महाराज, साईनाथ महाराज, श्रीराम, खंडेराव महाराज यांच्या गाभाºयात आकर्षक गुलाबपुष्पांची सजावट केली आहे. सकाळी ९ वाजता देवीची विधिवत पूजा करून अभिषेक करण्यात आला. त्यानंतर देवीला हिरवे पातळ, हिरव्या बांगड्यांचा चुडा, अलंकार व नथ चढविण्यात आली. यावेळी रेणुकामातेची विधिवत पूजा करून ग्रामस्थांच्या उपस्थितीत महाआरती पार पडली. सकाळपासूनच परिसरातील भाविकांची मंदिरात दर्शनासाठी गर्दी झाली होती.
यात्रेच्या दुसºया दिवशी म्हणजे शनिवारी (दि.२८) रोजी मंदिरासमोर हजेरीचा कार्यक्रम पार पडला. गावातील व पंचक्रोशीतील महिलांंनी नवस फेडण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. रात्री करमणुकीसाठी संगीता महाडिक यांचा लोकनाट्य तमाशा पार पडला. यात्रेत मिठाईवाले, खेळणीवाले, कटलरी दुकाने थाटण्यात आली होती. वावी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला होता.
कुस्त्यांची दंगल रंगली
रेणुकामाता यात्रोत्सवानिमित्त कुस्त्यांची दंगल हे येथील एक खास आकर्षण असते. कुस्त्यांच्या दंगलीसाठी नगर, कोल्हार, नेवासा, कोळपेवाडी, अकोला, नाशिक, अंबड, निफाड, संगमनेर, सिन्नर, अकोले येथील तसेच परिसरातील नामांंकित कुस्तीगिरांनी हजेरी लावली. जवळपास १०० च्या आसपास कुस्त्या झाल्या. विजेत्यांना शंभर रु पयांपासून तर एकवीसशे रुपयां- पर्यंतच्या पंचेचाळीस ते पन्नास हजार रुपयांची बक्षिसे वाटप करण्यात आली. यावेळी प्रथमच महिला कुस्तीपटूंनी हजेरी लावत स्पर्धेत सहभाग घेतला.