पतेती सण साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 01:01 AM2017-08-19T01:01:42+5:302017-08-19T01:02:02+5:30
नवरोज संपन्न झाल्यानंतर देवळालीतील पारसी बांधवांनी एकमेकांना हस्तांदोलन करीत व गळाभेट घेत नाशिक जिल्ह्यातील ब्रिटिश काळापासून असून, देवळाली येथे एकमेव असलेल्या अग्यारी (अग्निमंदिर) येथे पतेती सण शांततेत साजरा करण्यात आला.
देवळाली कॅम्प : नवरोज संपन्न झाल्यानंतर देवळालीतील पारसी बांधवांनी एकमेकांना हस्तांदोलन करीत व गळाभेट घेत नाशिक जिल्ह्यातील ब्रिटिश काळापासून असून, देवळाली येथे एकमेव असलेल्या अग्यारी (अग्निमंदिर) येथे पतेती सण शांततेत साजरा करण्यात आला.
आज पतेती सणानिमित्ताने पारशी बांधवांनी आपल्या पूर्वजांना शांती मिळावी याकरिता विविध पूजाअर्चा संपन्न झाल्या, दहाव्या दिवशी पतेती सण शांततेत पार पडला. पारसी बांधवांनी अग्यारीत पहाटे सहा ते नऊ अग्निपूजा, दहा वाजता पूर्वजांचे स्मरण करून करण्यात येणारी जश्न पूजा करण्यात आली, तर नववर्षाचा महिना सुरू होऊन पारसी नववर्ष सन प्रारंभ झाल्यामुळे दिवसभर परिसरातील नातेवाइकांची भेट घेत मिठाई देऊन नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या, दस्तुरजी (पुजारी) नोजर मेहनती यांसह समाजबांधवांनी एकत्र येत एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होण्याचे आवाहन केले. राज्याच्या विविध भागांतून येणाºया पारसी भाविकांनी येथे भोजनाचा आस्वाद घेतला. नाशिकसह राज्याच्या विविध भागांतून पारसी बांधवांनी देवळालीतील अग्यारी येथे येऊन विविध धार्मिक कार्य पार पाडले.