मराठा हायस्कूलमध्ये प्रेरणादिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:13 AM2021-04-05T04:13:16+5:302021-04-05T04:13:16+5:30
नाशिक : मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या नाशिक येथील मराठा हायस्कूलमध्ये कर्मवीर डाॅ.वसंतराव पवार यांचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात प्रेरणादिन म्हणून ...
नाशिक : मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या नाशिक येथील मराठा हायस्कूलमध्ये कर्मवीर डाॅ.वसंतराव पवार यांचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात प्रेरणादिन म्हणून साजरा करण्यात आला.
अध्यक्षस्थानी मविप्र समाज संस्थेचे सेवक संचालक तथा मराठा हायस्कूलचे मुख्याध्यापक गुलाबराव भामरे होते. व्यासपीठावर पर्यवेक्षक संजय डेर्ले, पुरुषोत्तम थोरात, अंबादास मते उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली. स्वर्गीय कर्मवीर डाॅ.वसंतराव पवार यांच्या प्रतिमेचे पूजन व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाचे संगीत शिक्षक दिनकर दांडेकर यांनी पवारसाहेबांविषयीची कृतज्ञता आपल्या ‘जागला जनसेवेच्या धर्मा...’ या गीतातून व्यक्त केली. त्यानंतर साहेबांच्या कार्याचा ओघवता आढावा सविता जाधव यांनी घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना गाजरे व चैताली गिते यांनी केले, तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक संजय डेर्ले यांनी केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
फोटो (०४मराठा हायस्कूल)
नाशिक येथील मराठा हायस्कूलमध्ये कर्मवीर डाॅ. वसंतराव पवार यांची जयंती साजरी करताना विद्यालयाचे मुख्याध्यापक गुलाबराव भामरे, पर्यवेक्षक संजय डेर्ले, पुरुषोत्तम थोरात, अंबादास मते सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी.