येवल्यात शिवजयंतीनिमित्तमिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 12:07 AM2018-03-05T00:07:48+5:302018-03-05T00:07:48+5:30

येवला : शिवसेनेच्या वतीने रविवारी (दि. ४) तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयापासून मिरवणुकीस प्रारंभ झाला.

Celebration of Shiv Jayanti in Yeola | येवल्यात शिवजयंतीनिमित्तमिरवणूक

येवल्यात शिवजयंतीनिमित्तमिरवणूक

googlenewsNext

येवला : शिवसेनेच्या वतीने रविवारी (दि. ४) तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयापासून मिरवणुकीस प्रारंभ झाला. शिवसेना कार्यालयात शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, ग्रामीण जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे यांच्या हस्ते आणि जिल्हा उपप्रमुख नीलेश चव्हाण, वाल्मीक गोरे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष नरेंद्र दराडे, पंचायत समिती माजी सभापती संभाजीराजे पवार, जिल्हा बॅँक संचालक किशोर दराडे, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, उपनगराध्यक्ष सूरज पटणी, राहुल शेळके (दिंडोरी), शिवसेना तालुकाप्रमुख झुंजार देशमुख, शहरप्रमुख राजेंद्र लोणारी आदींच्या प्रमुख उपस्थितीत शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. जय भवानी, जय शिवाजी च्या जयघोषात भगवे ध्वज फडकवित ढोलताशाच्या व डीजेच्या गजरात शहरातून मिरवणूक काढण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीत उत्साहवर्धक गीतांवर जागोजागी तरु णाईने चांगलाच ठेका धरला होता. शिवराय आणि मावळ्यांच्या वेशात अश्वारूढ झालेले युवक, अनेकांनी ठिकठिकाणी दाखविलेले मर्दानी कसरतींचे प्रदर्शन हे मुख्य आकर्षण होते. गणेश सोमासे, भीम परदेशी हे शिवरायांच्या, तर प्रफुल्ल ढगे, विश्वजित लोणारी हे मावळ्यांच्या वेशभूषेत अश्वारूढ झाले होते. फुलांनी सजविलेल्या ट्रॅक्टरमध्ये शिवरायांचा अर्धाकृती पुतळा ठेवण्यात आला होता. शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी शिवप्रतिमांचे पूजन करण्यात आले. ठिकठिकाणी युवकांनी लाठी-काठी व तलवारबाजीची प्रात्यक्षिके दाखविली. खांबेकर खुंटावर भाजपाच्या वतीने आनंद शिंदे यांनी पुष्पहार अर्पण केला. शहर सेनाप्रमुख राजेंद्र लोणारी, तालुकाप्रमुख झुंजारराव देशमुख, धीरज परदेशी यांचा भाजपाच्या वतीने दिनेश परदेशी, युवराज पाटोळे यांनी सत्कार केला. मिरवणुकीत, शिवसेना नेते संभाजीराजे पवार, जिल्हा बँक माजी अध्यक्ष नरेंद्र दराडे, माजी नगराध्यक्ष रामदास पहिलवान दराडे, युवा नेते कुणाल दराडे, शहर काझी राफिउद्दिन, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, उपनगराध्यक्ष सूरज पटणी, आनंदराजे शिंदे, सुभाष पहिलवान, पाटोळे, किशोर सोनवणे, प्रमोद तक्ते, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र लोणारी, सुभाष पहिलवान पाटोळे, जिल्हा उपप्रमुख वाल्मीक गोरे, भोलानाथ लोणारी, नगरसेवक झामभाऊ जावळे, किशोर सोनवणे, अरु ण शिंदे, शैलेश देसाई, नगरसेवक सरोजिनी वखारे, शिवसेना शहर उपप्रमुख महेश सरोदे, राहुल लोणारी, दीपक भदाणे, धीरज परदेशी, विठ्ठलराव आठशेरे, बाजार समिती संचालक कांतिलाल साळवे, पंचायत समिती सदस्य प्रवीण गायकवाड, माजी नगरसेवक संतोष परदेशी, रवि काळे, प्रज्वल पटेल, अमित अनकाईकर, बाळासाहेब गांगुर्डे, नितीन संसारे, रावसाहेब नागरे, प्रमोद तक्ते, अविनाश देसाई, अविनाश कुक्कर, भागीनाथ थोरात, दत्ता महाले, बालू परदेशी, खलील शेख, जुबेद सौदागर, निसार सौदागर, राशीद अन्सारी, अक्र म मुलतानी, अमित अनकाईकर, संदीप जाधव, सुनील लोणारी, सतीश कायस्थ, खंडू साताळकर आदींसह शिवप्रेमी नागरिक मिरवणुकीत सहभागी झाले होते. शिवसेनेच्या वतीने सकाळी सहा वाजेच्या सुमारास टिळक मैदानातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास तालुकाप्रमुख झुंजार देशमुख यांच्या हस्ते सपत्नीक अभिषेक करण्यात आला. मिरवणुकीदरम्यान विंचूर चौफुलीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महाराणा प्रताप, तुळजाभवानी यांना पुष्पहार अर्पण केला. शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून मिरवणुकीचा समारोप झाला. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रेरणेने स्वातंत्र्यपूर्व काळापासून येथील पाटोळे गल्लीत ७८ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या शिवजयंती उत्सवात सुभाष पहिलवान पाटोळे, शैलेश देसाई, बालू परदेशी, सुधाकर पाटोळे,आनंद शिंदे, युवराज पाटोळे, दिनेश परदेशी, रमेश भावसार यांच्या हस्ते शिवपुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रास्ताविक आनंद शिंदे यांनी केले. सुभाष पाटोळे यांनी मनोगतात शिवजयंती उत्सव हा केव्हा करावा याबाबत वादाचा विषय न राहता वर्षभर शिवजयंती उत्सव साजरा केला तरी कोणाची हरकत असण्याचे कारण नाही. आपले नेमून दिलेले कर्म वर्षभर प्रामाणकिपणे पार पाडावे, असे सांगितले. यावेळी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Celebration of Shiv Jayanti in Yeola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.