सिन्नर येथे शिवजन्मोत्सवाचा पाळणा सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:26 AM2021-02-21T04:26:43+5:302021-02-21T04:26:43+5:30

आडवा फाटा येथील शिवराज मावळे मित्रमंडळाचे अध्यक्ष कृष्णा कासार व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकाराने गेल्या १२ वर्षांपासून मंडळ शिवजन्मोत्सव ...

Celebration of Shivjanmotsava at Sinnar | सिन्नर येथे शिवजन्मोत्सवाचा पाळणा सोहळा

सिन्नर येथे शिवजन्मोत्सवाचा पाळणा सोहळा

Next

आडवा फाटा येथील शिवराज मावळे मित्रमंडळाचे अध्यक्ष कृष्णा कासार व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकाराने गेल्या १२ वर्षांपासून मंडळ शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. यावर्षीही कोणाकडूनही वर्गणी जमा न करता मंडळाच्या प्रमुख सभासदांनी पैसे जमा करून उत्सव साजरा करण्यात आला. यावर्षी शिवराज मावळे मित्रमंडळाने शिवजन्मोत्सव पाळणा सोहळा साजरा केला. उपस्थित महिलांच्या हस्ते हा सोहळा साजरा करण्यात आला. त्यासाठी स्टेजवर ६० बाय ५० फूट उंच किल्ल्याचा सेट उभारण्यात आला होता. २० फूट उंच महाराजांचा पुतळा ठेवण्यात आला होता. कोरोना काळात कोरोना योद्धा म्हणून काम केलेल्या व्यक्तींचा आमदार माणिकराव कोकाटे, शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड व जिल्हा परिषद सदस्य सीमंतीनी कोकाटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष कृष्णा कासार, विजय आव्हाड, गणेश माळी, जयराम शिंदे, हेमंत आंधळे, सचिन पाटील, विकास माळी, राहुल गरगटे, पिंटू चव्हाण, विजय भडांगे, ईश्वर काकड, सचिन शिंदे, पोपट लोंढे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो - २० सिन्नर पाळणा

सिन्नर येथील आडवा फाट्यावर शिवराज मावळे मित्रमंडळाच्या वतीने ६० बाय ५० फूट उंच किल्ल्याचा सेट उभारण्यात आला होता. यावेळी शिवजयंतीनिमित्त पाळणा सोहळा कार्यक्रम पार पडला.

===Photopath===

200221\20nsk_25_20022021_13.jpg

===Caption===

फोटो - २० सिन्नर पाळणा सिन्नर येथील आडवा फाट्यावर शिवराज मावळे मित्र मंडळाच्यावतीने ६० बाय ५० फूट उंच किल्ल्याचा सेट उभारण्यात आला होता. यावेळी शिवजयंतीनिमित्त पाळणा सोहळा कार्यक्रम पार पडला. 

Web Title: Celebration of Shivjanmotsava at Sinnar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.