मालेगाव शहर परिसरात सुभाषचंद्र बोस जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:14 AM2021-01-25T04:14:55+5:302021-01-25T04:14:55+5:30
महिला महाविद्यालय मालेगाव : येथील पुष्पाताई हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महिला महाविद्यालयात प्राचार्या डॉ. उज्ज्वला देवरे यांनी प्रतिमा ...
महिला महाविद्यालय
मालेगाव : येथील पुष्पाताई हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महिला महाविद्यालयात प्राचार्या डॉ. उज्ज्वला देवरे यांनी प्रतिमा पूजन केले. प्रा. डी. झेड. सावळे यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्या उज्ज्वला देवरे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. देवराम जाधव, डॉ. दिलीप पवार, प्रा. दीपाली चंद्रमोरे, डॉ. मीना पाटील, प्रा. शीतल साळुंके उपस्थित होते.
फोटो फाईल नेम : २४ एमजेएन ०२ . जेपीजी
फोटो कॅप्शन : मालेगाव येथील महिला महाविद्यालयात प्रतिमा पूजनप्रसंगी प्राचार्या डॉ. उज्ज्वला देवरे, उपप्राचार्य डॉ. देवराम जाधव, डॉ. दिलीप पवार, प्रा. दीपाली चंद्रमोरे, डॉ. मीना पाटील, प्रा. शीतल साळुंके आदी उपस्थित होते.
मराठी अध्यापक विद्यालय
मालेगाव : मराठी अध्यापक विद्यालय संलग्न सराव पाठशाळा येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही. डी. सोनवणे होते. त्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी छात्र अध्यापक शुभांगी काळे, हर्षदा अहिरे, अनुराधा पाटील, गायत्री वाघ, पूजा देवरे, शिरीन पिंजारी, जागृती पगारे आदींसह प्राचार्य सोनवणे यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन ज्योत्स्ना मार्तंड व सुजाता दळवी यांनी केले. आभार जागृती पगारे यांनी मानले. कार्यक्रमास प्रा. प्रदीप पाटील व डॉ. कविता पाटील आदींसह सर्व शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते.
एसपीएच विद्यालय
मालेगाव : येथील एस. पी. एच. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्युनिअर विभागाचे प्रा. पी. एच. बोरसे होते. प्रा. बोरसे व प्राचार्य एस. यू. निकम, पर्यवेक्षक एस. व्ही. पवार यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी प्रा. एस. के. बोरसे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन सी. एम. साळुंके यांनी केले. आभार एस. वाय. कोकणी यांनी मानले.
सिटी महाविद्यालयात
मालेगाव : येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य शिवानंद हाळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. नसीम अन्सारी उपस्थित होते.
डॉ. नसीम अन्सारी, डॉ. अरिफ अंजुम यांनी मार्गदर्शन केले. प्रास्तविक व सूत्रसंचालन मुबीन नजीर यांनी केले. आभार प्रा. शरीफ चौगुले यांनी मानले.
केबीएच विद्यालय वडेल
मालेगाव : तालुक्यातील वडेल येथील के. बी. एच. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक बी. जी. शेवाळे होते. पर्यवेक्षक शेवाळे व प्राचार्य एस. के. शिरोळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. व्ही. एस. दुकळे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागाचे प्रमुख वीरेंद्र निकम यांनी केले. आभार एच. एस. देशमुख यांनी मानले.
फोटो फाईल नेम : २४ एमजेएन ०३ . जेपीजी
फोटो कॅप्शन : वडेल येथील के. बी. एच. विद्यालयात प्रतिमा पूजनप्रसंगी प्राचार्य एस. के. शिरोळे, पर्यवेक्षक बी. जी. शेवाळे, व्ही. एस. दुकळे आदी उपस्थित होते.
शाह विद्यालय
मालेगाव : येथील श्री. र. वी. शाह माध्यमिक विद्यालयात अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक विवेक कासार होते. प्रमुख पाहुणे म्हणून व्ही. पी. आर्वीकर, स्मिता देशपांडे, आर. एल. फडके, एस. पी. बेलन उपस्थित होते. प्रास्ताविक पी. एस. पाटील यांनी केले. मानव अहिरे या विद्यार्थ्याचे भाषण झाले. बी. जी. निकम, आर्वीकर, पर्यवेक्षक देशपांडे यांची भाषणे झाली.
फोटो फाईल नेम : २४ एमजेएन ०१ . जेपीजी
फोटो कॅप्शन : मालेगावी र. वी. शाह विद्यालयात प्रतिमा पूजनप्रसंगी मुख्याध्यापक विवेक कासार, व्ही. पी. आर्वीकर, स्मिता देशपांडे, आर. एल. फडके, पी. एस. पाटील, बी. जी. निकम आदी उपस्थित होते.
===Photopath===
240121\24nsk_1_24012021_13.jpg~240121\24nsk_2_24012021_13.jpg~240121\24nsk_3_24012021_13.jpg
===Caption===
फोटो कॅप्शन बातमीसोबत आहे.~फोटो कॅप्शन बातमीसोबत आहे.~फोटो कॅप्शन बातमीसोबत आहे.