बैलपोळ्याचा सण खड्डे बुजवून केला साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 04:41 PM2018-09-09T16:41:54+5:302018-09-09T16:42:19+5:30
घोटी : इगतपुरी शहराला जोडणार्या जुन्या महामार्गाची पावसाळ्यात प्रचंड खड्डे पडून चाळण झालेली असल्याने वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.याचा सर्वाधिक फटका रिक्षाचालकांना बसत असल्याने या रस्त्यावरील खड्डे श्रमदानातून बुजविण्याचा निर्धार केला.यानुसार आज बैलपोळ्याच्या पाशर््वभूमीवर गांधीगिरी करीत रस्त्यावरील खड्डे श्रमदानाने बुजविले.

याबाबत वृत्त असे की,तालुक्याचे ठिकाण असलेल्या इगतपुरी शहराच्या प्रवेशद्वारी बोरटेम्भे ते पंचायत समतिी पर्यंतच्या दोन किलोमीटर अंतरावर पावसामुळे प्रचंड खड्डे पडले आहेत.या खड्ड्याच्या फटका वाहनचालकांना बसत असून सर्वाधिक त्रास रिक्षाचालकांना बसत आहे.या खड्ड्यामुळे रिक्षाचे सर्वात जास्त नुकसान होत असल्याने रिक्षाव्यवसाय धोक्यात आला आहे.या रस्त्याची किमान दुरु स्ती करावी अथवा खड्डे बुजवावे अशी मागणी अनेकदा करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल न घेतल्याने अखेर हे खड्डे श्रमदानातून बुजविण्याचा निर्णय इगतपुरी घोटीतील रिक्षाचालकांनी घेतला.यानुसार खड्डे बुजविण्यासाठी शेतकर्याचा पवित्र सण बैलपोळ्याचा सण निवडण्यात आला.
यानुसार आज सकाळी इगतपुरी घोटीतील गुरु नाथ कातकरी,भगीरथ आडोळे,धनराज आडोळे,संतोष केने,महादेव आडोळे,सिदेश्वर गवळी,पंढरी मेले,भरत आडोळे,चंद्रकांत,लक्ष्मण आडोळे,आत्माराम आडोळे,सचिन गतिर,परशुराम,केशव नवले,लष्मीकांत आडोळे,बाळू हडप व भारत मोरे ईश्वर बॉंडे, किशोर गतिर आदीसह शेकडो रिक्षाचालकांनी बोरटेम्भे ते पंचायत समतिी पर्यंतचा रस्त्यावरील खड्डे श्रमदानातून बुजविले.रिक्षाचालकांच्या या उपक्र माचे वाहनचालकांनी कौतुक केले आहे.
अनिल भोपे
इगतपुरी शहराला जोडणारा हा मुख्य रस्ता पिहल्याच पावसात खड्डेमय झाला होता.पावसाने विश्रांती घेतल्यानंतर या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यवाही करेल असे अभिप्रेत असताना मात्र संबधित विभागाने लक्ष दिले नाही अखेर रिक्षाचालकांनी बैलपोळा सणाच्या पाशर््वभूमीवर या रस्त्यावरील खड्डे बुजवून शासनाला चपराक दिली आहे.