कक्ष कार्यान्वित; पण मार्गदर्शनाविषयी संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 09:27 PM2020-08-20T21:27:48+5:302020-08-21T00:38:28+5:30

नाशिक : महिला व बालकांसाठी राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती व अंमलबजावणी एकाच छताखाली करण्यासाठी जिल्हा पातळीवर ...

Cell executable; But confusion about guidance | कक्ष कार्यान्वित; पण मार्गदर्शनाविषयी संभ्रम

कक्ष कार्यान्वित; पण मार्गदर्शनाविषयी संभ्रम

Next
ठळक मुद्देशासनाकडे लक्ष : महिला बाल विकास विभागाची अवस्था

नाशिक : महिला व बालकांसाठी राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती व अंमलबजावणी एकाच छताखाली करण्यासाठी जिल्हा पातळीवर महिला व बाल कक्ष सुरू करण्याचे आदेश शासनाने दिले, मात्र कुठल्या योजना, कशा पद्धतीने द्याव्यात त्यासाठीचे कोणतेही मार्गदर्शन केले नसल्याने राज्यातील महिला व बाल विकास तसेच एकात्मिक बाल विकास सेवा योजना अधिकारी संभ्रमात पडले आहेत.
स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर महिला व बाल कल्याण विभागाचे सचिवानी या संदर्भात आदेश काढून प्रत्येक जिल्हा परिषदेच्या मुख्यालय येथे महिला व बाल विकास कक्ष कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
राज्य सरकार स्तनदा, गरोदर माता, अंगणवाडी बालके, कुपोषित बालकांसाठी ज्या योजना राबविते, त्या सर्व योजनांचा लाभ एका छताखाली देण्यात याव्यात अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत. त्यानुसार नाशिक जिल्हा परिषदेत सदरचा कक्ष सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र या कक्षाचे कामकाज कोठून चालेल, त्यासाठी अधिकारी, कर्मचारी कसे उपलब्ध करावेत, कक्ष कसा कामकाज करेल या बाबतच्या कोणत्याही मार्गदर्शन शासनाकडून करण्यात आलेले नाही.
मुळात जिल्हा परिषदेचे लाभार्थी ग्रामीण, अति दुर्गम भागातील असतात. त्यांना त्यांच्या गावातच महिला व बाल विकास विभागाच्या योजनांचा लाभ दिला जातो. एकही लाभार्थी वंचित राहू नये यासाठी पुरेपूर काळजी घेतली जाते. ग्रामीण भागातील वर्ग असल्याने त्यांच्या कडे शहरात येण्यासाठी पैसे नसतात या साºया गोष्टी राज्य शासनाच्या महिला व बाल कल्याण विभागाला अवगत आहेत. तरी देखील जिल्ह्याच्या मुख्यालय येथे कक्ष कार्यान्वित करण्याबाबतचा आग्रह अधिकाऱ्यांना समजू शकलेला नाही. हा कक्ष कुठे असावा, त्याची रचना, कार्यपद्धती, अधिकारी, कर्मचाºयांची नेमणूक, कक्ष सुरू ठेवण्यासाठी लागणार खर्च अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळालेली माहिती. त्यामुळे महिला व बाल कल्याण सभापती सह अधिकारीदेखील शासनाच्या मार्गदर्शनाच्या प्रतीक्षेत आहेत.

Web Title: Cell executable; But confusion about guidance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.