सिमेंट कॉँक्रीटचा रस्ता पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 05:55 PM2020-08-25T17:55:07+5:302020-08-25T17:56:08+5:30

नांदगाव : मनमाड (व्हाया जगधने वाडा) ते नांदगावदरम्यान सिमेंट कॉँक्रीटमध्ये बनवलेला रस्त्याचा भाग जलमय झाला असून, त्यावरून अखंड पाणी वाहत असल्याने या रस्त्यावरून जाणारी वाहने व पायी प्रवास करणाऱ्यांची अडचण झाली आहे.

Cement concrete road underwater | सिमेंट कॉँक्रीटचा रस्ता पाण्याखाली

पहिल्याच पावसाळ्यात पाण्याखाली गेलेला जगधने वाडा ते नांदगाव शहर रस्त्याचा भाग.

googlenewsNext
ठळक मुद्देमनमाड-नांदगाव रस्ता : पितळ उघडे; वाहनधारकांसह पायी प्रवास करणाऱ्यांची गैरसोय

नांदगाव : मनमाड (व्हाया जगधने वाडा) ते नांदगावदरम्यान सिमेंट कॉँक्रीटमध्ये बनवलेला रस्त्याचा भाग जलमय झाला असून, त्यावरून अखंड पाणी वाहत असल्याने या रस्त्यावरून जाणारी वाहने व पायी प्रवास करणाऱ्यांची अडचण झाली आहे.

हा रस्ता २.५ किमी लांबीचा असून, नांदगाव शहरातली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महत्त्वाचा आहे. मनमाडकडून येणारी वाहने शनिमंदिराकडून शहरात प्रवेश करतात. त्यासाठी एक रस्ता शाकांबरी नदीतूनही आहे. याला पर्याय म्हणून शहराच्या अलीकडे सुमारे तीन किमी अंतरावर मनमाडकडून येणाºया मुख्य रस्त्यापासून (राष्टÑीय महामार्ग) फाटा फुटून जगधने वाडामार्गे शहरात प्रवेश करता येतो. यामुळे सुमारे एक ते दीड किमी अंतर कमी होते. रस्ता थेट शहराच्या देवीमंदिराजवळ निघत असल्याने वेळ वाचतो व शनिमंदिराकडून येणारी रहदारीची कोंडी कमी होते; मात्र पाऊस नसतानाही वाहनधारकांना व पादचाºयांना या मार्गावरून पाण्यातून जावे लागते. ही खरी समस्या आहे.
नाल्याच्या पात्रातून सुमारे १०० ते १५० मीटर लांबीचा रस्ता जातो. उर्वरित रस्ता डांबराचा असला तरी नदीपात्रातला रस्ता सिमेंट कॉँक्रीटचा बनवण्यात आला आहे. नैसर्गिक उतारावरून जाणारे पाणी कॉंक्रीटच्या रस्त्यावरून प्रवास करत पुन: नाल्याच्या मूळ वळणावर येऊन पुढे वाहत जाते. पाऊस आल्यानंतर रस्त्यावरून पाणी वाहणे अपेक्षित असले तरी नालापात्रात रस्ता बनवून त्यावरील पाण्यातून वाहतूक करणे हे या रस्त्याच्या आराखड्याचे वैशिष्ट्य बनले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठी गटार तयार करून त्यातून नाल्याचे पाणी वाहून जाईल अशी व्यवस्था करता आली असती, असा प्रश्न जगधने वाडा व नांदगाव शहरातील नागरिकांना पडला आहे.

रस्त्याच्या जडणघडणीत अडचणींवर मात करणारे कॉँक्रीट तंत्रज्ञान वापरले गेले की तंत्रज्ञानातल्या अपूर्ण जाणिवांचे प्रदर्शन दोन महिने रस्त्यावरून वाहणाºया पाण्यामुळे नागरिकांना झाले आहे. या विचारात शेवाळलेल्या रस्त्यावरून दुचाकीधारक असोत की पायचारी दोघांना कसरत करावी लागते हे खरे.

 

Web Title: Cement concrete road underwater

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.