सिमेंटच्या रिकाम्या गोण्यांपासून चºहाट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 00:33 IST2019-08-22T23:31:26+5:302019-08-23T00:33:56+5:30
टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवून मातंग समाजबांधव उदरनिर्वाह करीत असल्याचे चित्र पांडाणे परिसरात दिसून येत आहे. टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी हे बांधव सिमेंटच्या रिकाम्या गोण्या आणून त्या माध्यमातून चºहाट बनवितात. त्यानंतर ते बाजारात विकून चरितार्थ करतात.

दिंडोरी तालुक्यातील माळे दुमाला येथील मातंग वस्तीवर बैलपोळ्यासाठी चºहाट बनविताना संजय गांगुर्डे. सोबत फाडलेल्या सीमेंटच्या गोण्या.
पांडाणे : टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवून मातंग समाजबांधव उदरनिर्वाह करीत असल्याचे चित्र पांडाणे परिसरात दिसून येत आहे. टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी हे बांधव सिमेंटच्या रिकाम्या गोण्या आणून त्या माध्यमातून चºहाट बनवितात. त्यानंतर ते बाजारात विकून चरितार्थ करतात.
घराचे बांधकाम ज्या भागात चालू आहे, त्या भागात जाऊन साठ पैसे ते एक रुपयाप्रमाणे रिकाम्या सिमेंटच्या गोण्या विकत आणायच्या. त्यापासून गुरांसाठी चºहाट व दोर बनवायचे. साधारण शंभर सिमेंटच्या गोण्यांपासून १५ ते १८ दोर तयार होतात. त्यांची बाजारात विक्र ी केली की ४०० ते ५०० रुपये मिळतात. त्यातून १०० गोण्यांचा मोबदला देऊन तीनशे रुपयात प्रपंच भागवित असल्याचे संजय गांगुर्डे व अलका गांगुर्डे यांनी सांगितले. तीस वर्षांपासून हा व्यवसाय गांगुर्डे दांपत्य करते.
प्रथम कोणत्याही कंपनीच्या रिकाम्या सिमेंटच्या गोण्या आणायच्या. त्या पाण्यात धुतल्यानंतर त्यांच्या एक ते दीड इंच लांबीच्या पट्ट्या काढून त्या गोण्यांचे धागे काढून त्यातून चºहाट व दोर बनविले जातात. तीन दोरी लावून एक चºहाट बनविले जाते. सर्वच मटेरियल तयार असल्यास दिवसाला तीस ते चाळीस दोर बनविले जातात व ते बाजारात विक्र ीसाठी नेले जातात. माळे दुमाला मातंग वस्तीवर सात ते आठ कुटुंब दोर बनविण्याचे काम करून आपला प्रपंच भागवितात.