सिमेंट, स्टील महागल्याने बांधकाम व्यवसाय अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:16 AM2021-02-13T04:16:30+5:302021-02-13T04:16:30+5:30

नाशिक : स्टील व सिमेंटच्या किमती वाढल्याने बांधकाम व्यवसाय अडचणीत आला असून इमारत बांधकाम खर्चातही मोठ्या प्रमाणात वाढ ...

Cement, steel prices hurt construction business | सिमेंट, स्टील महागल्याने बांधकाम व्यवसाय अडचणीत

सिमेंट, स्टील महागल्याने बांधकाम व्यवसाय अडचणीत

Next

नाशिक : स्टील व सिमेंटच्या किमती वाढल्याने बांधकाम व्यवसाय अडचणीत आला असून इमारत बांधकाम खर्चातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचा थेट परिमाम घरांच्या किमतीवर होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे घराचे स्वप्नही महाग होत असून विविध विकासकामांच्या खर्चातही वाढ होत असल्याने दरवाढीचा विकासावरही विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे बांधकाम व्यवसायातील सिमेंट व स्टीलसारख्या महत्त्वाच्या साहित्याच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने नियंत्रक प्राधिकरण नेमण्याची मागणी बांधकाम व्यावसायिकांकडून होत आहे. सिमेंट व स्टील कंपनीच्या नफेखोरीच्या विरोधात राज्यसभा व लोकसभा यामध्ये देखील चर्चा होऊन सिमेंटच्या कृत्रिम दरवाढीचा सामान्य माणसांवर बोजा पडू नये. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी व दरवाढीच्या निषेधासाठी देशभरासह पूर्ण नाशिक जिल्ह्यातील बांधकामे शुक्रवारी बंद ठेवण्यात आली होती. ‘बीआयए’तर्फे पुकारलेल्या या संपात अन्य बांधकाम संघटनाही सहभागी झाल्यामुळे शुक्रवारी शहर व जिल्ह्यातील सर्व नवीन बांधकामे तसेच सरकारी कामेही बंद ठेवण्यात आल्याची माहिती बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष राहुल सूर्यवंशी यांनी दिली. दरम्यान, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियातर्फे पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी सूरज मांढरे व मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिक यांना देण्यात यासंदर्भात निवेदन देण्यात आलेे. यावेळी बीएआयच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, माजी अध्यक्ष अविनाश पाटील, मोहन कटारिया, रामेश्वर मालानी, मदन जगोटा, राजेंद्र मुथा आदी उपस्थित होते.

कोट-

देशातील गृहनिर्माणसाठी सर्वाधिक म्हणजे सुमारे ५५ ते ६५ टक्के सिमेंट व स्टीलचा वापर करण्यात येतो. हेच प्रमाण वाणिज्य व औद्योगिक बांधकामासाठी १० ते १५ टक्के, मूलभूत सुविधांसाठी १५ ते २५ टक्के व औद्योगिक निर्माणासाठी ५ ते १५ टक्के आहे. यामुळे वाढलेल्या दरांचा सर्वाधिक फटका हा गृहनिर्माण क्षेत्राला बसणार आहे.

- राहुल सूर्यवंशी, अध्यक्ष, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया

===Photopath===

120221\12nsk_48_12022021_13.jpg

===Caption===

पालकमंत्री छगन भूजबळ यांना निवेदन देतांना बीएआय नाशिक शाखेचे अध्यक्ष राहुल सूर्यवंश. समवेत माजी अध्यक्ष अविनाश पाटील, मोहन कटारिया,रामेश्वर मालानी, मदन जगोटा, राजेंद्र मुथा, भाऊसाहेब सांगळे , मनोज खांडेकर,  विलास निफाडे , सुरेश पवार , शिवाजी घुले , प्रवीण जाधव ,अमित अटल , गोरख काटकर , जोशी जोसेफ , प्रशांत सोनजे , महेश भामरे , रमेश शिरसाट व महेंद्र पाटील आदी

Web Title: Cement, steel prices hurt construction business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.