स्मशानभूमीचे काम निकृष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 10:20 PM2020-02-05T22:20:31+5:302020-02-06T00:49:24+5:30
दरेगाव : चांदवड तालुक्यातील निमोण येथे जनसुविधाअंतर्गत स्मशानभूमीचे बांधकाम करण्यात येत आहे. मात्र हे काम आरसीसी असल्याने निकृष्ट दर्जाचे ...
दरेगाव : चांदवड तालुक्यातील निमोण येथे जनसुविधाअंतर्गत स्मशानभूमीचे बांधकाम करण्यात येत आहे. मात्र हे काम आरसीसी असल्याने निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांनी केली आहे
याबाबत सुवर्णा लाड, मनीषा आहेर, तुळसा सानप, बाळू बोरसे, नागू आहेर, मधुकर सानप, भगवान लाड यांनी चांदवड पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे याप्रकरणी लेखी तक्र ार दिली आहे.
निमोण येथे सुरू असलेल्या स्मशानभूमीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून, हे काम खराब अवस्थेत दिसत आहे. कामाचा पाया तसेच मुरूम टाकून कमी सिमेंटचा वापर करून कोबा करण्यात आला आहे. भविष्यात या कामापासून धोका निर्माण होऊ शकतो. या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी. ठेकेदाराला कामाचे बिल अदा करू नये, अशी मगणी करण्यात आली आहे.
गावात चार महिन्यापूर्वी बांधण्यात आलेले स्वच्छतागृहाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने बांधकामानंतर काही दिवसात भिंत जमीनदोस्त झाल्याने संबंधित ठेकेदारावर कारवाई करून ठेकेदाराकडून सदर रक्कम वसूल करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निमोण येथील ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी लेखी तक्र ार दाखल केली असून, या कामाचा निधी ग्रामपंचायतीकडे आहे. सदर निधी थांबविण्यात आला आहे. जोपर्यंत काम योग्य होत नाही तोपर्यंत ग्रामपंचायतीने निधी अदा करू नये.
- महेश पाटील, गटविकास अधिकारी, पंचायत समिती