केवळ ओबीसी नको सर्व जातींच्या आधारावर जनगणना करावी : आठवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 00:24 IST2020-03-03T00:21:01+5:302020-03-03T00:24:16+5:30
नाशिक : केवळ ओबीसींची जनगणना न करता सर्व जातींच्या आधारावर जनगणना होणे आवश्यक आहे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

केवळ ओबीसी नको सर्व जातींच्या आधारावर जनगणना करावी : आठवले
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : केवळ ओबीसींची जनगणना न करता सर्व जातींच्या आधारावर जनगणना होणे आवश्यक आहे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
श्री काळाराम मंदिर सत्याग्रह स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी रामदास आठवले नाशिक येथे आले होते. यावेळी त्यांनी येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. २०११ नंतर अनेक बौद्धांनी आपल्या जातीच्या दाखल्यांवर बौद्ध असा उल्लेख केला आहे. पण जातीचा उल्लेख केला जात नसल्याने त्यांना सर्वसाधारण गटात धरले जात असून, असे लोक मागासवर्गीयांच्या सवलतींपासून वंचित राहात आहेत.
याबाबत आपण लवकरच सुधारणा विधेयक आणणार असल्याची माहिती त्यांनी दिली. काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह हा समतेचा सत्याग्रह असून आज देशभरात परिवर्तन होत आहे. देशभरात एक लाखाहून अधिक आंतरजातीय विवाह होत आहेत. ही चांगली बाब आहे मात्र अजूनही मागासवर्गीयांवर अत्याचाराच्या घटना सुरूच असल्याचे त्यांनी सांगितले. शासनकर्ती जमात बना, असे डॉ. बाबासाहेबांनी सांगितले होते, पण रिपाइं एकट्याने सत्तेवर येणे शक्य नाही युती केल्याशिवाय सत्ता मिळणार नाही. त्यामुळे रिपाइंने भाजपशी युती केली आहे. त्यामुळे काही विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत अफवा पसरवत आहेत, मात्र पंतप्रधान मोदी हे संविधानाचा आदर करतात. संविधान हा माझ्यासाठी धर्मग्रंथ असल्याचे मोदी म्हणतात, असे आठवले
म्हणाले.
केंद्र सरकारने आणलेल्या सीएए कायद्याचे समर्थन करून या कायद्याला आपल्या पक्षाचा पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले. या कायद्यावरून कॉँग्रेसला केंद्र सरकारवर टीका करण्याची संधी मिळाली. मुस्लिमांना त्यापासून कोणताही धोका नसून जर त्यांचे नुकसान होणार असेल तर आपण मुस्लिमांच्या बाजूने उभे राहू, असेही त्यांनी सांगितले. दिल्लीत झालेल्या दंगलीमागे कॉँग्रेस आणि आपचा हात असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. देशभरात एक कोटी सभासदांचे लक्ष्यकेंद्रीय निवडणूक आयोगाने रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले) या पक्षाला मान्यता दिली असून, येत्या सहा महिन्यांत पक्षसदस्य नोंदणी करून पक्षांतर्गत निवडणुका घेऊन ते सर्व दस्तऐवज निवडणूक आयोगाला सादर करावयाचे आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात पक्ष सदस्य नोंदणी करून संघटनात्मक निवडणुका घ्याव्यात. देशभरात किमान एक कोटी आणि महाराष्टÑात किमान ६० ते ७० लाख पक्ष सभासद नोंदणीचे उद्दिष्ट असून, कार्यकर्त्यांनी त्यासाठी कामाला लागावे अशा सूचना पक्षाचे राष्टÑीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी पक्ष कार्यकर्त्यांना केल्या.