माणकेश्वर वाचनालयाचा शतकपूर्ती महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 06:29 PM2019-07-12T18:29:38+5:302019-07-12T18:29:57+5:30
पुरस्कार वितरण : कवीसंमेलनासह व्याख्यान संपन्न
निफाड : येथील श्री माणकेश्वर वाचनालयाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त देण्यात येणारा स्वर्गीय गीतकार राम उगावकर स्मृती राज्यस्तरीय पुरस्कार श्रीरामपूर येथील कवी व गीतकार बाबासाहेब सौदागर यांना जेष्ठ कवी अरु ण म्हात्रे यांच्या हस्ते देण्यात आला. दरम्यान, शतकमहोत्सवानिमित्त कवीसंमेलनासह व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बाबासाहेब सौदागर यांनी सांगितले की, कलात्मक उंचीचे गाणं लिहिल्यावर खूप मोठा आनंद मिळतो. माझे निफाडशी कुठल्यातरी जन्माचे किंवा जिव्हाळ्याचे नाते असेल म्हणूनच तुम्ही मला पुरस्कार दिला, असा कृतज्ञता भाव व्यक्त केला. जेष्ठ कवी अरु ण म्हात्रे यांनी सांगितले, चित्रपटाचा प्राण हा कथेत असतो. गितकाराने मातीला धरून लिखाण केले पाहिजे, चांगला गीतकार चांगला कवी असतो, असेही ते म्हणाले. याप्रसंगी शिवाजी ढेपले,दत्ता उगावकर, मधुकर शेलार यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच श्री माणकेश्वर वाचनालयाच्या शताब्दी महोत्सव निमित्त न्यायमूर्ती रानडे यांच्या पणती श्रीमती वसुधाताई आपटे यांचे रमाबाई रानडे यांच्या जीवनकार्यावर व्याख्यान झाले. व्यासपीठावर मुक्त विद्यापीठाचे परीक्षाविभाग प्रमुख जयंवत खडताळे, वाचनालयाचे अध्यक्ष दत्ता उगावकर, निफाड अर्बन बँकेचे अध्यक्ष रामदास व्यवहारे, उपाध्यक्ष संजय पोफळीया आदी मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी शिवाजी ढेपले होते. सूत्रसंचालन सुहास सुरळीकर यांनी केले. आभार बाळासाहेब कापसे यांनी मानले.