केंद्र, राज्यातील सरकारचा पराभव निश्चित : छगन भुजबळ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 01:25 PM2019-01-08T13:25:25+5:302019-01-08T13:26:32+5:30

येवला: शेतक-यांच्या शेतमालाला दीडपट हमीभाव देणार, दरवर्षी दोन कोटी बेरोजगार तरु णांना रोजगार देणार, धनगर मुस्लिम समाजाला आरक्षण देणार, प्रत्येक नागरिकाच्या खात्यात १५ लाख रु पये जमा करणार अशा अनेक खोट्या घोषणा करून सत्तेवर आलेल्या सरकारला धडा शिकवण्याची संधी सोडू नका. जनतेलादेखील ‘अच्छे दिन’ पाहायला मिळाले असून फसव्या सरकारचा पराभव निश्चित असल्याचा विश्वास राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.

Center, state's defeat of the government is certain: Chhagan Bhujbal | केंद्र, राज्यातील सरकारचा पराभव निश्चित : छगन भुजबळ 

केंद्र, राज्यातील सरकारचा पराभव निश्चित : छगन भुजबळ 

Next

येवला: शेतक-यांच्या शेतमालाला दीडपट हमीभाव देणार, दरवर्षी दोन कोटी बेरोजगार तरु णांना रोजगार देणार, धनगर मुस्लिम समाजाला आरक्षण देणार, प्रत्येक नागरिकाच्या खात्यात १५ लाख रु पये जमा करणार अशा अनेक खोट्या घोषणा करून सत्तेवर आलेल्या सरकारला धडा शिकवण्याची संधी सोडू नका. जनतेलादेखील ‘अच्छे दिन’ पाहायला मिळाले असून फसव्या सरकारचा पराभव निश्चित असल्याचा विश्वास राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. येवला तालुक्यातील उंदीरवाडी, वडगाव, बल्हेगाव विविध विकास कामांच्या भूमिपूजन व उद्घाटनाप्रसंगी भुजबळ बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस अ‍ॅड. माणिकराव शिंदे होते. भुजबळ म्हणाले, नोटबंदीमुळे छोटे छोटे उद्योजक अडचणीत आले, कित्येक निष्पाप जिवांचा बळी गेला, जीएसटीमुळे उद्योगधंदे बंद पडले, रोजगार मिळणे तर दूरच . एक कोटी तरूणांना बेरोजगार होण्याची वेळ आली. शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे देशातील प्रगतीच्या दिशेने सुरू असलेली वाटचाल थांबली असल्याचा घणाघात भुजबळ यांनी केला. मला २०१६ मध्ये सूडापोटी तुरु ंगात पोहोचवले. देशातील प्रमुख विरोधी पक्षांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकविण्याचे कारस्थान देशभरात सुरू आहे. महाराष्ट्र सदन हे वास्तुकलेचा अप्रतिम नमुना आहे. कुशल कारागिरांकडून हे काम करून घेतले आहे. अगदी पंतप्रधान मोदी, राहुल गांधी सुद्धा येथे बैठका घेतात. यावरून या वास्तुच्या गुणवत्तेचा अंदाज येतो शासनाचा एकही पैसा खर्च न करता ही वास्तू उभारण्यात आली असतानाही मोठा घोटाळा झाल्याची अफवा उठविण्यात आल्याचे भुजबळ म्हणाले.

Web Title: Center, state's defeat of the government is certain: Chhagan Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक