केंद्रीय समिती दुष्काळी पाहणी करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 12:14 AM2018-12-05T00:14:28+5:302018-12-05T00:14:56+5:30
नाशिक : राज्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारने पाहणी करण्यासाठी १२ जणांचे पथक राज्यातील विविध भागांत पाठविले आहे. त्यानुसार नाशिक विभागाच्या पाहणीसाठी येणारे पथक गुरुवारी जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांना भेट देणार आहे. पथकाच्या दौºयामुळे जिल्हा प्रशासनाची धावपळ उडाली आहे.

नाशिक जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये यंदा कमी पर्जन्यमान झाल्यामुळे खरीप हंगाम वाया गेला आहे. शासनाने दुष्काळ जाहीर करण्याबाबत ठरवून दिलेल्या निकषानुसार पीक परिस्थिती, पर्जन्यमान, पीक कापणी प्रयोग राबवून गेल्या महिन्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला. दुष्काळाला तोंड देण्यासाठी राज्य शासनाने उपाययोजना लागू केल्या असल्या तरी, प्रत्यक्ष शेतकºयाला अर्थिक मदत मिळू शकलेली नाही. त्यासाठी केंद्र सरकार पथक पाठविणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.
मालेगाव तालुक्यातील जळगाव निंबायती, मेहुणे आदी गावांना भेटी देऊन रात्री नाशिक मुक्कामी थांबून दुसºया
दिवशी नगरकडे रवाना होणार आहे. या पथकाला दुष्काळी स्थिती अवगत व्हावी यासाठी जिल्हा प्रशासन विविध प्रकारची माहिती संकलित करीत असून, दौºयाचे आयोजनासाठी धावपळ केली जात आहे.५ ते ७ डिसेंबर असे तीन दिवस हे पथक प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी करतील तसेच शेतकºयांशीही संवाद साधणार आहे. नाशिक जिल्ह्यात गुरुवारी सकाळी धुळ्याहून हे पथक मालेगाव तालुक्यात प्रवेश करेल.