नाशिक-पुणे रेल्वेमार्गाला केंद्र शासनाची मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 11:24 PM2020-06-05T23:24:15+5:302020-06-05T23:59:04+5:30
नाशिकच्या विकासकासाठी महत्त्वाचा असणाऱ्या नाशिक-पुणे रेल्वेमार्गाच्या प्रस्तावास मध्य रेल्वे बोर्डानंतर आता केंद्र शासनाने काही अटी-शर्तींवर तत्त्वत: मान्यता दिली आहे, अशी माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.
नाशिकरोड : नाशिकच्या विकासकासाठी महत्त्वाचा असणाऱ्या नाशिक-पुणे रेल्वेमार्गाच्या प्रस्तावास मध्य रेल्वे बोर्डानंतर आता केंद्र शासनाने काही अटी-शर्तींवर तत्त्वत: मान्यता दिली आहे, अशी माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.
नाशिक, पुणे आणि मुंबई हा राज्यातील विकासाचा सुवर्ण त्रिकोण असल्याने नाशिक आणि पुणे ही शहरे रेल्वमार्गाने एकमेकांना जोडली जावीत यासाठी गोडसे यांनी राज्याबरोबरच केंद्राकडेही पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यांनी संसदेतही हा प्रश्न उपस्थित केला होता. या मार्गाच्या सर्वेक्षणासाठी अर्थसंकल्पात दोनशे कोटी रुपये मंजूर झाले होते. या मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.
यावेळी प्रस्तावाच्या डीपीआरमध्ये राज्य शासनाचे असलेले केवळ २० टक्के शेअर्स, राज्य सरकारकडून मुद्रांक शुल्काची अपेक्षित शाश्वती, प्रकल्पाच्या व्यवहार्यतेसाठी विविध तांत्रिक विभागांची आवश्यकता व निरीक्षणे, प्रस्तावित रेल्वेमार्ग मालगाडी वाहतुकीसाठी सक्षम करण्यासाठीच्या उपाययोजना, प्रोजेक्टच्या यÞशस्वतेसाठी जे. व्ही. माडेल, एमसीए विभागाची मान्यता आदी मुद्द्यांवर प्रशासनाने निरीक्षणे नोंदवली होती. त्यानंतर हा प्रस्ताव मान्यतेसाठी केंद्राकडे पाठविण्यात आला होता. केंद्र शासनाने नाशिक-पुणे रेल्वेमार्गाच्या प्रस्तावास काही अटी-शर्ती व तत्त्वता मान्यता दिली असल्याचे गोडसे यांनी कळविले आहे.