केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातमूल्य वाढविल्याने कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकरी चिंतातुर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 11:36 PM2017-11-30T23:36:34+5:302017-12-01T00:12:28+5:30
केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातमूल्य वाढविल्याने भावात घसरण झाली असून, निर्यातमूल्य कमी करण्यात यावे, अशी मागणी खामखेडा परिसरातील शेतकºयांनी केली आहे.
खामखेडा : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातमूल्य वाढविल्याने भावात घसरण झाली असून, निर्यातमूल्य कमी करण्यात यावे, अशी मागणी खामखेडा परिसरातील शेतकºयांनी केली आहे. कांद्याच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने निर्यात-मूल्यावर अचानक दर ८५० डॉलर वाढ केल्याने कांद्याच्या भाव कमी झाल्याने शेतकºयांत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील कसमादे परिसरात लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. लाल कांदा या पिकाकडे नगदी पीक म्हणून पाहिले जाते. या कांदा पिकाच्या येणाºया पैशातून शेतकºयांची मोठी उलाढाल केली जाते. परंतु गेल्या दोन-तीन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय तोट्यात येत आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीसह वादळी वारा व अवकाळी पावसामुळे उन्हाळी कांदा व कांद्याच्या डोंगळ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे कांद्याच्या बियाणाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला होता. तेव्हा शेतकºयाने जिल्ह्यासह परजिल्ह्यातून लाल कांदाची महागडी बियाणे खरेदी केली. चालूवर्षी सुरुवातीला पावसाळा उशिरा झाल्याने कांद्याचे बियाणे उशिरा टाकल्यामुळे लाल कांदाची लागवड उशिरा केली होती. कांदा ४ हजार ते ३५०० रुपयांपर्यंत विकला जाऊ लागला होता. परंतु पुन्हा कांद्याचा भाव कमी झाल्याने या कांद्याच्या मिळणाºया पैशातून त्याला सोसायटी, बॅँक व हात उसनवार पैसे परत करायचे होते. तेव्हा केंद्र सरकारने कांदा निर्यातमूल्यामध्ये वाढ केल्याने कांद्याच्या भावात घसरण होऊन कांदा २००० ते ३००० रुपये भावाने बाजारात विकला जात आहे. यामुळे शेतकºयाचे आर्थिक नियोजन ढासळले आहे. आता बँक, सहकार सोसायटी व उसनवार कर्ज कसे परत करावे या विवेचनात शेतकरी पडला आहे. तेव्हा केंद्र सरकारने निर्यातमूल्य कमी करावे, अशी मागणी खामखेडा परिसरातील शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.
नांदगाव बाजार समितीमध्ये आठ हजार क्विंटल आवक
नांदगाव येथील बाजार समितीमध्ये कांद्याचे भाव पाचशे ते आठशे रुपयांनी एकीकडे कोसळले असतानादेखील कांद्याची आवक मात्र मोठी झाली. जवळपास आठ हजारांहून अधिक क्विंटल आवक झाली. सरासरीपेक्षादेखील आज मोठ्या प्रमाणात आवक वाढलेली होती. रात्री उशिरापर्यंत जवळपास तीनशेहून अधिक वाहने बाजार समितीच्या आवारात दाखल झाली होती. एरवी तीनशे ते साडेतीनशे अशा प्रमाणात वाहने येत असल्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक वाढू लागल्याचे दृश्य सायंकाळी आवारात उभ्या असलेल्या ट्रॅक्टरच्या संख्येवरून जाणवत होते. सकाळच्या पहिल्या सत्रात जवळपास सातशेचाळीस वाहने दाखल झाली होती. लिलाव सुरू झाले तेव्हा हजार रुपयांपासून ३०३७ रुपयांपर्यंतचे भाव निघाले; मात्र सरासरी २६५० रुपये अशी राहिली. लाला कांद्याची घसरण अशी सुरू असतानादेखील दुसरीकडे मोठ्या संख्येने वाहने रात्री उशिरापर्यंत दाखल होत होती. तीनशे वाहने उभी असल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली. दरम्यान नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तालुक्यातील बोलठाण उपबाजार आवारात १४५ वाहने दाखल झाली होती. बोलठाणला ३४०५ रुपये भाव मिळाला असला तरी येथील सरासरी मात्र २६४५ रु पये अशी राहिली.