थाळ्या, टाळ्या वाजवत केंद्र सरकारचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:15 AM2021-05-22T04:15:06+5:302021-05-22T04:15:06+5:30
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर प्रहार शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सदर आंदोलन केले. मागील आठवड्यात केंद्र सरकारने तूर डाळी सह ...
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर प्रहार शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सदर आंदोलन केले. मागील आठवड्यात केंद्र सरकारने तूर डाळी सह इतर डाळी परदेशातून आयात करण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांना मारक ठरणारा आहे. वास्तविक देशात पंचेचाळीस लाख टन डाळीचे उत्पादन होत असून देशाची गरज बेचाळीस ते त्रेचाळीस लाख टन आहे. देशाअंतर्गत उत्पादन गरजेपेक्षा जास्त असूनही केंद्र सरकार सुमारे सात लाख टन डाळी परदेशातुन आयात करत असून त्यात नेमका कुणाचा फायदा आहे, असा सवाल प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन यांनी यावेळी बोलतांना केला. आंदोलनात तालुकाध्यक्ष महाजन, अमोल फरताळे, किरण चरमळ, वसंत झांबरे, शंकर गायके, शिवाजी निकम, संतोष रंधे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने तालुक्यातील विविध गावांमध्येही पदाधिकारी, कार्यकर्त्यानी थाळ्या, टाळ्या वाजवून केंद्र सरकारचा निषेध केला.
फोटो- २१ येवला प्रहार
येवला येथे थाळ्या-टाळ्या वाजवून केंद्र सरकारचा निषेध करताना प्रहार संघटनेचे कार्यकर्ते.
===Photopath===
210521\21nsk_30_21052021_13.jpg
===Caption===
फोटो- २१ येवला प्रहार येवला येथे थाळ्या-टाळ्या वाजवून केंद्र सरकारचा निषेध करताना प्रहार संघटनेचे कार्यकर्ते.