कांदाप्रश्नी केंद्रीय कृषिमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 06:04 PM2018-12-13T18:04:04+5:302018-12-13T18:04:27+5:30

दिल्लीत शिष्टमंडळ भेटले : अनुदान देण्याची मागणी

 The Central Minister of Agriculture | कांदाप्रश्नी केंद्रीय कृषिमंत्र्यांना साकडे

कांदाप्रश्नी केंद्रीय कृषिमंत्र्यांना साकडे

Next
ठळक मुद्देआमदार अनिल कदम आणि आमदार डॉ. राहुल अहेर यांच्या नेतृत्वाखाली लासलगाव व चांदवड बाजार समितीच्या शिष्टमंडळाने केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांची भेट घेऊन चर्चा केली.

लासलगांव : कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव मिळण्यासाठी शासनाने कांदा उत्पादकांना एक हजार रुपये प्रती क्विंटल अनुदान द्यावे अथवा बाजार हस्तक्षेप योजना राबवावी या मागणीसह नाशिक जिल्ह्यातील कांदाप्रश्नी आमदार अनिल कदम आणि आमदार डॉ. राहुल अहेर यांच्या नेतृत्वाखाली लासलगाव व चांदवड बाजार समितीच्या शिष्टमंडळाने केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांची भेट घेऊन चर्चा केली.
सध्या नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये रब्बी (उन्हाळ) कांद्याबरोबर खरीप (लाल) कांद्याची विक्र ी होत असून उन्हाळ कांद्यापाठोपाठ लाल कांद्यालाही मातीमोल बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. जुलै महिन्यात लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांदा कमीत कमी ४०० रु पये तर जास्तीत जास्त १५५२ रु पये आणि सर्वसाधारण ११५१ रु पये प्रति क्विंटलने विकला गेला. मात्र, आता सदरचा उन्हाळ कांदा कमीत कमी २०१ रु पये, जास्तीत जास्त ६९० रु पये आणि सर्वसाधारण ३७० रु पये प्रति क्विंटलने विकला जात आहे. कांद्यास मिळणाऱ्या दरातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी पूर्णत: हतबल झाला असून केंद्र सरकारने यावर त्वरित उपाययोजना करावी यासाठी निफाडचे आमदार अनिल कदम, देवळा-चांदवडचे आमदार डॉ. राहुल अहेर, राज्य कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, दिंडोरीचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण, लासलगांव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर, उपसभापती ललित दरेकर, चांदवड बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, चांदवड पंचायत समितीचे सभापती नितीन गांगुर्डे, चांदवड नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी (दि.१३) नवी दिल्ली येथे केंद्रीय कृषि मंत्री राधामोहन सिंह यांची भेट घेऊन महाराष्टÑात कांदा बाजारभाव घसरणीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीबाबत अवगत करून दिले.

Web Title:  The Central Minister of Agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.