मध्य नाशिक : पारंपरिक आडाख्यांपेक्षा सुशिक्षित मतदानच निर्णायकमतदारांना गृहीत धरणे पडले महागात

By admin | Published: October 30, 2014 12:11 AM2014-10-30T00:11:55+5:302014-10-30T00:11:55+5:30

मध्य नाशिक : पारंपरिक आडाख्यांपेक्षा सुशिक्षित मतदानच निर्णायकमतदारांना गृहीत धरणे पडले महागात

Central Nashik: The educated voting is more expensive than traditional archers. | मध्य नाशिक : पारंपरिक आडाख्यांपेक्षा सुशिक्षित मतदानच निर्णायकमतदारांना गृहीत धरणे पडले महागात

मध्य नाशिक : पारंपरिक आडाख्यांपेक्षा सुशिक्षित मतदानच निर्णायकमतदारांना गृहीत धरणे पडले महागात

Next

नाशिक : सारेच पक्ष स्वबळावर निवडणूक लढवित असल्याने आपली ताकद आजमावण्याची साऱ्याच उमेदवारांना संधी देणाऱ्या मध्य नाशिक मतदारसंघात सारेच पारंपरिक आडाखे चुकवले आणि अर्थकारणाच्या जोरावर विशिष्ट मतांची बेगमी करणाऱ्या उमेदवारांना धडा शिकवतानाच, मतदारांना कोणी गृहीत धरू शकत नाही, हेही या मतदारांनी सिद्ध केले.
मध्य नाशिक मतदारसंघात मतदारांचीच दोन भागांत विभागणी करून आपल्या विजयाचे गणित मांडण्याचा प्रयत्न या निवडणुकीतील बहुसंख्य उमेदवारांनी केला होता. त्याआधारे विशिष्ट मतांकडेच लक्ष केंद्रित केले होते; परंतु या मतदारसंघात उमेदवारांना मिळालेल्या मतदानाची केंद्रनिहाय आकडेवारी उपलब्ध झाल्यानंतर उच्चभ्रू मतदार हा निर्णायक ठरू शकत नाही असे आजवर मानणाऱ्या उमेदवारांना या मतदारांनी निर्णय फिरवण्याची क्षमता असल्याचे दाखवून दिलेच; परंतु जी मते आपल्या ताकदीने कुठेही फिरवू शकतो अशा मुखंडांनादेखील मतदारांनी तोंडघशी पाडले. राज ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून ज्या मतदारांनी पाच वर्षांपूर्वी मनसेला साथ दिली, त्याच मतदारांनी मनसेचे प्रभाव क्षेत्र असलेल्या सर्वच भागांत या पक्षाला नाकारले. अव्वल क्रमांक दूरच; परंतु दुसऱ्या क्रमाकांसाठीही गिते यांना तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या उमेदवारांनी झुंजवले यातच सारे आले. ज्या भागात भाजपाला साथ मिळणारच नाही असे समजले जात होते, तेथेही भाजपाला मतदान झाल्याने मतदारांचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले. पक्षांतर्गत राजी- नाराजी, बलस्थाने या उमेदवारांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असतात हे खरे असले, तरी या सर्वांपलीकडे निवडणुकीत कोणता निकाल द्यायचा हे मतदारच ठरवित असतो आणि तेच स्पष्ट करणारा हा निकाल ठरला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Central Nashik: The educated voting is more expensive than traditional archers.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.