पेलिकन पार्कच्या जागेवर ‘सेंट्रल पार्क’चा प्रस्ताव; निधीची मागणी : १५ कोटी खर्च अपेक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 12:31 AM2017-12-04T00:31:11+5:302017-12-04T00:32:37+5:30

नाशिक : सिडकोतील बहुचर्चित पेलिकन पार्कच्या जागेबाबत न्यायालयाकडून कोणत्याही प्रकारचे आदेश नसल्याने पार्कची जागा विकसित करण्याचा महापालिकेचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे महापालिकेने पेलिकन पार्कच्या जागेवर ‘सेंट्रल पार्क’ उभारण्याचा प्रस्ताव तयार केला असून, त्यासाठी सुमारे १५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. महापालिकेने त्याकरिता शासनाकडे निधी मिळविण्यासाठी आमदार सीमा हिरे यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू केला आहे.

 Central Park proposal for Pelican Park; Funding demand: 15 crores expenditure expected | पेलिकन पार्कच्या जागेवर ‘सेंट्रल पार्क’चा प्रस्ताव; निधीची मागणी : १५ कोटी खर्च अपेक्षित

पेलिकन पार्कच्या जागेवर ‘सेंट्रल पार्क’चा प्रस्ताव; निधीची मागणी : १५ कोटी खर्च अपेक्षित

Next
ठळक मुद्दे पेलिकन पार्कच्या जागेवर ‘सेंट्रल पार्क’चा प्रस्ताव;निधीची मागणी : १५ कोटी खर्च अपेक्षित

नाशिक : सिडकोतील बहुचर्चित पेलिकन पार्कच्या जागेबाबत न्यायालयाकडून कोणत्याही प्रकारचे आदेश नसल्याने पार्कची जागा विकसित करण्याचा महापालिकेचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे महापालिकेने पेलिकन पार्कच्या जागेवर ‘सेंट्रल पार्क’ उभारण्याचा प्रस्ताव तयार केला असून, त्यासाठी सुमारे १५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. महापालिकेने त्याकरिता शासनाकडे निधी मिळविण्यासाठी आमदार सीमा हिरे यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू केला आहे.
शनिवारी (दि.२) विधी समितीच्या सभेत मनसेचे गटनेते सलीम शेख यांनी पेलिकन पार्कबाबत प्रश्न उपस्थित केला असता, विधी विभागाचे प्रमुख बी. यू. मोरे यांनी सांगितले, पेलिकन पार्कचे ठेकेदार पूना अ‍ॅम्युझमेंटने महापालिकेविरुद्ध जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला होता.
परंतु, सदर निकाल महापालिकेच्या बाजूने लागला. त्यानंतर ठेकेदाराने पुन्हा वरिष्ठ न्यायालयात अपील दाखल केले परंतु, तेथेही मनपाच्याच बाजूने कौल मिळाला. ठेकेदाराने उच्च न्यायालयात धाव घेतली परंतु, न्यायालयाने अपील दाखल करून घेताना कुठलाही आदेश दिलेला नाही. त्यामुळे पेलिकन पार्कची जागा महापालिका विकसित करू शकते. त्यावर सलीम शेख यांनी सदर जागेत नागरिकांना सोयी-सुविधा पुरविणारा प्रकल्प उभारण्याची सूचना केली. दरम्यान, पेलिकन पार्कच्या जागेचा तिढा सुटल्याने महापालिकेच्या बांधकाम विभागाने त्याठिकाणी ‘सेंट्रल पार्क’ उभारण्याचा प्रस्ताव तयार केला असून, त्याठिकाणी मूलभूत सोयी-सुविधा मिळाव्यात याकरिता शासनाकडे निधीची मागणी केलेली आहे. तसा प्रस्ताव नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांनी शासनाकडे दिलेला असून, निधीसाठी पाठपुरावा सुरू आहे. सदर पार्कसाठी सुमारे १५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सेंट्रल पार्कमध्ये काय सेंट्रल पार्कमध्ये प्रामुख्याने जॉगिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक तसेच लहान मुले व ज्येष्ठांसाठी स्वतंत्र उद्यान यासाठी मनोरंजनाची साधने उपलब्ध करून दिली जाणार आहेत. आमदार सीमा हिरे यांनी यापूर्वीच सदर जागेवर ‘नमो उद्यान’ विकसित करण्याचा संकल्प सोडलेला आहे.

Web Title:  Central Park proposal for Pelican Park; Funding demand: 15 crores expenditure expected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cidcoसिडको