मध्य रेल्वेच्या आठ महिन्यात १४५ रॅक रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 12:44 AM2020-11-26T00:44:49+5:302020-11-26T00:45:14+5:30
मध्य रेल्वेने या आर्थिक वर्षातील एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांच्या कालावधीत १४५ रॅक्स ऑटोमोबाइल लोड केल्या आहेत. मागील संपूर्ण आर्थिक वर्षात एकूण ११८ रॅक लोड केले असल्याने गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी कोरोनाच्या संकटातसुद्धा ऑटोमोबाइल लोडिंगची वाढली गती वाढली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मनमाड : मध्य रेल्वेने या आर्थिक वर्षातील एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांच्या कालावधीत १४५ रॅक्स ऑटोमोबाइल लोड केल्या आहेत. मागील संपूर्ण आर्थिक वर्षात एकूण ११८ रॅक लोड केले असल्याने गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी कोरोनाच्या संकटातसुद्धा ऑटोमोबाइल लोडिंगची वाढली गती वाढली असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या १९ नोव्हेंबरपर्यंत मध्य रेल्वेतील भुसावळ विभागातून कार, ट्रॅक्टर, पिकअप व्हॅन, जीप आदींचे ८० रॅक्स, पुणे विभागातून ५३ रॅक्स, नागपूर विभागातून ९ रॅक्स व मुंबई विभागातून ३ रॅक्स मोटारींची वाहतूक केली आहे. या आर्थिक वर्षात सन २०२० -२०२१ मध्ये आठ महिन्यांपेक्षा कमी कालावधीत १४५ रॅक्समध्ये मोटारींची वाहतूक करण्यात आली. भुसावळ विभागाने चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत ८० रॅक लोड केल्या आहेत. देशांतर्गत रेल्वे वाहतूक सेवा बरीच लोकप्रिय झाली आहे. मेसर्स महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेड नाशिकने काळेकोंडा, चित्तपूर, रक्सौल या नवीन ठिकाणी लोडिंग करून रवाना केली आहे. भारतीय रेल्वेने घेतलेल्या सुलभ मालवाहतुकीसाठी अनेक उपाययोजना आणि मध्य रेल्वेच्या पाचही विभागांत स्थापन केलेल्या व्यवसाय विकास युनिट च्या विशेष विपणन प्रयत्नांमुळे ऑटोमोबाइल लोडिंगची गती वाढली आहे