मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प; चाकरमान्यांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 12:46 PM2018-09-14T12:46:23+5:302018-09-14T12:46:35+5:30

मनमाड, घोटी : मध्य रेल्वेच्या कसारा आसनगांव दरम्यान उंबरमाळी जवळ रेल्वेची ओव्हरहेड दुरस्ती करणारी रेल्वे गाडी मुंबईकडे जात असतांना पहाटेच्या सुमारास रेल्वे रु ळावरून घसरल्याने मुंबईला जाणारी व नाशिककडे येणारी वाहतुक पुर्णपणे ठप्प झाली.

 Central railway traffic jam; Chalkman's hall | मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प; चाकरमान्यांचे हाल

मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प; चाकरमान्यांचे हाल

Next

मनमाड, घोटी : मध्य रेल्वेच्या कसारा आसनगांव दरम्यान उंबरमाळी जवळ रेल्वेची ओव्हरहेड दुरस्ती करणारी रेल्वे गाडी मुंबईकडे जात असतांना पहाटेच्या सुमारास रेल्वे रु ळावरून घसरल्याने मुंबईला जाणारी व नाशिककडे येणारी वाहतुक पुर्णपणे ठप्प झाली. या अपघातामुळे सकाळी मुंबईला कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले. सकाळी साडे आठ वाजेपर्यंत कसाºयाहून मुंबईला जाण्यासाठी एकही लोकल न आल्याने वासिंद स्थानकातील प्रवाशांनी संतप्त होत रेल प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणा देत रेलरोको केला. यामुळे पंचवटी व राज्यराणी एक्सप्रेस रद्द करण्यात आली. दरम्यान या घटनेमुळे लांब पल्ल्याच्या मुंबईला जाणार्या काही गाड्या कसारा, इगतपुरी, देवळाली स्थानकावर थांबवण्यात आल्या. अखेर बºयाच प्रवाशांनी वैतागुन मुंबई आग्रा महामार्गावर येत मिळेल त्या वाहनांनी इच्छीत स्थळी जाणे पसंत केले. लांब पल्ल्ल्याच्या गाड्या खोळंबल्या असून इगतपूरीपर्यंत लांब पल्ल्याच्या गाड्या थांबल्या आहेत. वाहतूक पूर्ववत होण्यासाठी चार ते पच तासांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. गुरु वारी मध्यरात्री मध्य रेल्वेच्या ओव्हरहेड वायर दुरु स्त करणारी व्हॅन उंबरमाळी स्थानकात
रु ळावरून घसरली. पहाटेपासून रु ळावरु न घसरलेली व्हॅन रु ळावर आणण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, या दरम्यानच मुंबईकडे येणाºया लांब पल्ल्याच्या गाड्या खोळंबल्या. सकाळपर्यंत दुरु स्तीचे काम पूर्ण न झाल्यामुळे कसारा स्थानकातून एकही लोकल सोडण्यात आली नाही. त्यामुळे कसारा ते आसनगाव दरम्यानची वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
------------------
मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प : दरभंगा एलटीटी पवन एक्स्प्रेस,
अमृतसर मुंबई एक्स्प्रेस, गोरखपूर एलटीटी कुशीनगर एक्स्प्रेस,
शालिमार एलटीटी एक्स्प्रेस, हावडा मुंबई मेल व्हाया नागपूर,
नागपूर मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस, अमरावती मुंबई एक्स्प्रेस, गोंदिया मुंबई विदर्भ एक्स्प्रेस, फिरोजपूर मुंबई पंजाब मेल, सिकंदराबाद मुंबई देविगरी एक्स्प्रेस, भुसावळ पुणे एक्स्प्रेस, मंगला एक्स्प्रेस
मनमाड मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस

Web Title:  Central railway traffic jam; Chalkman's hall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक