१६ दिवसांनी बाधित पुन्हा शतकपार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2021 01:40 AM2021-10-15T01:40:20+5:302021-10-15T01:41:18+5:30

जिल्ह्यात गुरुवारी (दि. १४) तब्बल १६ दिवसांनी पुन्हा नवीन बाधित संख्येने शतकी आकडा ओलांडत १२९ पर्यंत मजल गाठली आहे. यापूर्वी २९ सप्टेंबरला १५५ बाधित होते. त्यानंतर सातत्याने बाधितांचा आकडा शंभरच्या आत होता.दरम्यान दिवसभरात कोरोनामुक्तची संख्या केवळ ७१ होती.

Centuries crossed again after 16 days! | १६ दिवसांनी बाधित पुन्हा शतकपार !

१६ दिवसांनी बाधित पुन्हा शतकपार !

Next

नाशिक : जिल्ह्यात गुरुवारी (दि. १४) तब्बल १६ दिवसांनी पुन्हा नवीन बाधित संख्येने शतकी आकडा ओलांडत १२९ पर्यंत मजल गाठली आहे. यापूर्वी २९ सप्टेंबरला १५५ बाधित होते. त्यानंतर सातत्याने बाधितांचा आकडा शंभरच्या आत होता.दरम्यान दिवसभरात कोरोनामुक्तची संख्या केवळ ७१ होती.

जिल्ह्यात एकूण बाधितांपैकी ८४ बाधित नाशिक ग्रामीणचे तर ४० नाशिक मनपा आणि ५ जिल्हाबाह्य बाधित आहेत. त्याशिवाय नाशिक ग्रामीणला एका नागरिकाचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या ८६५१ वर पोहोचली आहे. दरम्यान, जिल्ह्यात उपचारार्थी रुग्णसंख्या ७२३ वर पोहोचली आहे. त्यात सर्वाधिक ४३६ नाशिक ग्रामीण, २५४ नाशिक मनपा, १६ मालेगाव मनपा तर १७ जिल्हाबाह्य नागरिकांचा समावेश आहे. १४४९ अहवाल प्रलंबित आहेत. त्यात ९४६ अहवाल नाशिक ग्रामीणचे, ३२८ नाशिक मनपाचे, १७५ मालेगाव मनपाचे अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्यातील कोरोनामुक्त नागरिकांचे सरासरी प्रमाण ९७.७१ टक्क्यांवर पोहोचले आहे.

इन्फो

 

कोरोनामुक्त ४ लाखांवर

 

जिल्ह्यात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ४ लाख २३८ वर पोहोचली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४ लाख ९ हजार ६१२ रुग्ण बाधित झाले होते. त्यातील ४ लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले, ही जिल्ह्याच्या दृष्टीने दिलासादायक बाब आहे. त्यात सर्वाधिक कोरोनामुक्त रुग्ण २ लाख २६ हजार ६४८ हे नाशिक मनपाचे तर नाशिक ग्रामीणचे १ लाख ५१ हजार ६३४, मालेगाव मनपाचे १२ हजार २९२ तर जिल्हाबाह्य ५७४८ आणि अन्य ३९१६ जणांचा समावेश आहे.

Web Title: Centuries crossed again after 16 days!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.