रब्बीच्या पेरण्यांची शंभरी
By Admin | Published: January 18, 2017 01:01 AM2017-01-18T01:01:38+5:302017-01-18T01:01:51+5:30
रब्बीच्या पेरण्यांची शंभरी
नाशिक : खरिपात दमदार पाऊस झाल्याने रब्बी हंगामासाठी एकूण लागवड क्षेत्राच्या शंभर टक्के रब्बी हंगामाच्या पेरण्या होण्याची शक्यता होती. जानेवारीच्या दुसऱ्या आठवडाअखेर एकूण १ लाख २० हजार ७०० हेक्टर क्षेत्रापेक्षा जास्त १ लाख २४ हजार ५९६ (१०३ टक्के) क्षेत्रावर रब्बीच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पाऊस दमदार झाल्याने आणि नियोजनानुसार शेतीसाठी पाण्याची आवर्तने सोडण्यात आल्याने रब्बीच्या उद्दिष्टापेक्षा जास्त क्षेत्रावर पेरण्या झालेल्या आहेत. रब्बी गव्हाचे ६४ हजार ९०० हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात ६५ हजार ९४६ हेक्टर क्षेत्रावर रब्बीच्या गव्हाची पेरणी झाली आहे. त्या खालोखाल रब्बी हरभरा पिकाचे सरासरी क्षेत्र ३९ हजार ५०० हेक्टर असताना प्रत्यक्षात ४४ हजार ७८१ हेक्टर क्षेत्रावर रब्बीच्या
हरभरा पिकाची पेरणी झाली आहे. रब्बी मका पिकाचे २७०० हेक्टर क्षेत्र असताना प्रत्यक्षात त्यापेक्षा दुप्पट ४८४२ हेक्टर क्षेत्रावर रब्बी मका पिकाच्या पेरण्या झाल्या आहेत. दमदार पाऊस झाल्यानेच रब्बीच्या एकूण १ लाख २० हजार ७०० हेक्टरपेक्षा जास्त १ लाख २४ हजार ५९६ हेक्टर क्षेत्रावर रब्बीच्या पेरण्या झाल्या आहेत. (प्रतिनिधी)
दहा हजार हेक्टरवर ऊसलागवड
जिल्ह्यात एकूण ९ हजार ६५९ हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड करण्यात आली आहे. त्यात आडसाली उसाची ४ हजार १९० हेक्टर, पूर्व हंगामी १३८१ हेक्टर, सुरू- ५६५ हेक्टर, खोडवा- ३५२३ हेक्टर अशी उसाची लागवड झाली आहे. दमदार पाऊस झाल्याने उसाची लागवड वाढण्याची चिन्हे होती. प्रत्यक्षात तूर्तास दहा हजार हेक्टरच्या आसपास उसाची लागवड झाल्याचे चित्र आहे.