प्रलंबित कामांबाबत सीईओ घेणार हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 12:42 AM2019-01-17T00:42:58+5:302019-01-17T00:43:32+5:30
नाशिक : जिल्हा परिषदेतील विविध विभागातील कामांची दिरंगाई आणि नियोजनाचा अभाव सातत्याने समोर आल्यानंतर आता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांची हजेरी घेण्यास सुरुवात केली आहे. येथील विविध विभागात कामांना दिरंगाई होत असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गिते यांनी कामे पूर्णत्वासाठी वेळापत्रकच आखून दिले असून, त्यानुसार कामकाजाची त्यांना अपेक्षा आहे. यासाठी ते आता अचानक विभागांना भेटी देणार आहेत.

जिल्हा परिषदेतील कामांना गती यावी यासाठी करण्यात आलेल्या अनेक उपाययोजनांतर्गत गिते यांनी कामांचे नियोजन केले असून, फाईल्सची गतीदेखील वाढविली आहे; मात्र विभागप्रमुख आणि कर्मचाºयांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने कामांना विनाकारण विलंब होत असल्याचे अनेक प्रकार समोर आल्यानंतर आता गिते यांनी याकामी अधिकारी, कर्मचाºयांना कामकाजाची दिशा ठरवून दिली आहे. या संदर्भात त्यांनी नुकतान ई-निविदेबाबतही आढावा घेतला.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम, लघु पाटबंधारे व ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत करण्यात येणारी कामे विहित वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी सर्व विभागांना वेळापत्रक तयार करून देणेत आले आहे. वेळापत्रकानुसारच यापुढे प्रत्येक निविदा कामाचा आढावा होणार असून, आचारसंहितेपूर्वी सर्व विभागांनी निविदा प्रक्रि या पूर्ण करून कार्यारंभ आदेश देण्याचे निर्देश सर्व विभागांना देण्यात आले आहेत. सदरचे काम विहित वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी गिते यांनी विविध विभागांचा दैनंदिन आढावा घेण्यास सुरु वात केली असून, सकाळी त्यांनी विविध विभागात भेटी देऊन कामाचा आढावा घेतला.
बांधकाम दोन विभागातील सुनील जाधव व प्रशांत पगारे यांचेकडील कामकाजाची तपासणी करून प्रलंबित कामांबाबत माहिती घेऊन सूचना दिल्या. यापुढेही विविध विभागात भेटी देऊन कर्मचाºयांच्या कामाचा आढावा घेणार असल्याचे डॉ. गिते यांनी सांगितले. या संदर्भात त्यांनी संबंधित विभाग प्रमुखांनादेखील सूचना केल्या असून, निवडणूक आचारसंहितेपूर्वी कार्यारंभ आदेशाबाबत कामात गती देण्याच्याही सूचना केल्या आहेत. प्रलंबित कामांचा आढावाई-निविदेच्या कामाबाबत सर्व संबंधित कर्मचाºयांचा आढावा घेतल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी आता संबंधित विभागांना भेटी देऊन कर्मचाºयांचा आढावा घेण्यास सुरु वात केली आहे. गिते यांनी बुधवारी (दि.१६) रोजी बांधकाम विभागांना भेटी देऊन प्रलंबित कामांचा आढावा घेऊन विहित वेळेत काम करण्याचे निर्देश दिले.