सीईओंनाच शिक्षक बदलीचे अधिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 06:19 PM2018-10-31T18:19:16+5:302018-10-31T18:19:31+5:30

नाशिक : नियुक्ती प्राधिकारी तथा जिल्हा परिषद सीईओ यांनाच बदलीचे अधिकार असल्याचे माहिती अधिकारात माहिती देण्यात आली असतांना आणि ...

CEOs transfer authority | सीईओंनाच शिक्षक बदलीचे अधिकार

सीईओंनाच शिक्षक बदलीचे अधिकार

googlenewsNext
ठळक मुद्देविस्थापितांचा दावा: जिल्हा परिषद शिक्षण विभाग अनभिज्ञ


नाशिक: नियुक्ती प्राधिकारी तथा जिल्हा परिषद सीईओ यांनाच बदलीचे अधिकार असल्याचे माहिती अधिकारात माहिती देण्यात आली असतांना आणि ग्रामविकास विभागाच्या सचिवालयाच्या निर्णयातही अशीच माहिती देण्यात आलेली असतानाही जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मात्र बदलीबाबत संभ्रम निर्माण करीत असल्याचा दावा विस्थापित शिक्षकांच्या कृती समितीकडून करण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बदल्यांमधील गोंधळ अजूनही चर्चेत आहे. ज्या शिक्षकांची अन्याय झाल्याची भावना आहे त्यांच्याकडून या संदर्भातील हालचाली अद्यापही केल्या जात आहे. याच संदर्भात नाशिक जिल्ह्यातील शिक्षकांच्या चुकीच्या बदल्यांसाठी विस्थापित शिक्षकांची कृती समिती लढा देत आहे. आॅनलाईन बदल्यांमध्ये जाणिवपुर्वक चुकीची माहिती भरून सोयीच्या बदल्या पदरात पाडून घेणाऱ्यांवर अपेक्षित कारवाई होऊ शकली नसल्याचा कृती समितीचा आरोप आहे.
शासनाची दिशाभूल करण्याची अत्यंत गंभीर बाब शिक्षकांकडून होत असतांनाही त्यांच्या झालेल्या बदल्या कायम ठेवत फक्त एक वेतनवाढ रोखण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे अत्यंत सौम्य शिक्षा असल्याचे कृती समितीने म्हटले आहे.
आॅनलाईन शिक्षक बदली प्रक्रियेत काही अनियिमितता झाली असल्यास अशा अन्यायग्रस्त शिक्षकांच्या आॅफलाईन बदल्या करण्याचे शासनाचे निर्देश नसल्याचे सांगून जिल्हा परिषदेचे प्रशाासन शिक्षकांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Web Title: CEOs transfer authority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.