भेंडी येथील वातानुकूलित सुविधा केंद्रातून आता शेतमाल थेट परदेशात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 01:11 AM2018-12-09T01:11:56+5:302018-12-09T01:15:33+5:30
कळवण : भेंडी येथे सर्व सोयीसुविधांयुक्त आणि वातानुकूलित बांधण्यात आलेल्या कांदा, डाळिंब, द्राक्ष शेतमाल निर्यात सुविधा केंद्राला केंद्र सरकारच्या अपेडा या वाणिज्य मंत्रालयाने मान्यता दिल्याने या केंद्रातून आता थेट अमेरिका, यूरोप, हॉलंड व इतर देशात द्राक्षे, डाळिंब निर्यात होणार आहेत. परिणामी हॉलंडच्या द्राक्ष व्यापाऱ्यांची पाऊले कळवण तालुक्याच्या दिशेने पडू लागली आहेत.
कळवण : भेंडी येथे सर्व सोयीसुविधांयुक्त आणि वातानुकूलित बांधण्यात आलेल्या कांदा, डाळिंब, द्राक्ष शेतमाल निर्यात सुविधा केंद्राला केंद्र सरकारच्या अपेडा या वाणिज्य मंत्रालयाने मान्यता दिल्याने या केंद्रातून आता थेट अमेरिका, यूरोप, हॉलंड व इतर देशात द्राक्षे, डाळिंब निर्यात होणार आहेत. परिणामी हॉलंडच्या द्राक्ष व्यापाऱ्यांची पाऊले कळवण तालुक्याच्या दिशेने पडू लागली आहेत.
भाजपाचे तालुकाध्यक्ष सुधाकर पगार यांनी आठ एकरात गुणवत्तापूर्ण व एक्स्पोर्ट जम्बो ब्लॅक जातीची द्राक्ष लागवड केली असून, हॉलंड येथील मेटा आणि लॅमी समा या दोन व्यापाºयांनी द्राक्षबागेची पाहणी केली आहे.
मेटा आणि लॅमी समा हे दोघे व्यापारी सध्या भारतातून यूरोपमध्ये मासे, डाळिंब व इतर फळे निर्यात करीत असतात. मोरोक्को आणि इस्रायलमधून डाळिंब खरेदी करून जगभरात पाठवित असल्याने कळवण तालुक्यातील त्यांच्या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
कळवण तालुक्यात गुणवत्तापूर्वक द्राक्ष व डाळिंब पिकवले जातात. यूरोप, जर्मनी, जपान, बेल्जियम, अमेरिका येथे द्राक्षाला अधिक भाव मिळत असल्याने तेथे द्राक्ष जावीत यासाठी द्राक्ष उत्पादक शेतकरी अधिक आग्रही असतात; मात्र द्राक्ष यूरोप व अन्य ठिकाणी न जाता व्यापारी अन्य देशांत पाठवावी लागतील, असे सांगून भाव कमी करण्याचे उद्योग करतात त्यामुळे भेंडी केंद्राला कृषी व प्रक्रि या अन्नपदार्थ निर्यात विकास प्राधिकरणने मान्यता दिल्याने भेंडी येथून यूरोपसह अन्य ठिकाणी द्राक्ष व डाळिंब निर्यात होणार असल्याने हॉलंडच्या व्यापाºयांनी कळवणला द्राक्षबागांची पाहणी केली. भेंडी येथील निर्यात सुविधा केंद्राला परदेशी पाहुण्यांनी भेट देऊन शीतगृह व कांद्याची प्रतवारी करणाºया मशिनरीची पाहणी केली. तालुक्यातील द्राक्ष विक्रीसाठी तयार होण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागणार असल्याने या परदेशी व्यापाºयांनी जानेवारी महिन्यापासून कळवण तालुक्यातून द्राक्ष खरेदी करणार असल्याचे सांगितले. परदेशी पाहुण्यां-समवेत तालुका कृषी अधिकारी विजय पाटील, शेतकरी सहकारी संघाचे सभापती निंबा पगार, रवींद्र हिरे, लाला पगार, कामेश पगार आदींसह पंचक्र ोशीतील द्राक्ष व डाळिंब उत्पादक शेतकरी बांधव उपस्थित होते.परदेशी पाहुण्यांनी द्राक्षबागेची पाहणी करून समाधान व्यक्त केले. जम्बो ब्लॅक व्हरायटी आठ एकर क्षेत्रात लागवड केली आहे. फळधारणेचे पहिलेच वर्ष आहे. साधारण एक महिन्यात फळ विक्र ीस तयार होणार आहे. एकरी दहा टन उत्पन्न अपेक्षित असून, परदेशात एक्स्पोर्ट करणार आहे. - कामेश पगार, युवा शेतकरी कळवणपणन व्यवस्थापक सुनील पवार यांच्या सहकार्याने हॉलंड येथील व्यापारी नाशिक जिल्ह्यात आले आहेत. भाजीपाला, द्राक्ष व डाळिंब खरेदी करून परदेशात निर्यात करणार आहेत. जानेवारी महिन्यापासून जिल्ह्यात द्राक्ष खरेदी करणार आहेत. - प्रशांत नहारकर, संचालक, सद्गुरु अॅग्रो