बिनविरोध नागरे यांना प्रमाणपत्र प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 12:33 AM2019-06-25T00:33:18+5:302019-06-25T00:33:45+5:30
नाशिक मनपाच्या प्रभाग क्रमांक १० ड मधून बिनविरोध निवडून आलेल्या भाजपाच्या इंदूबाई सुदाम नागरे यांची सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी हेमांगी पाटील यांनी औपचारिक घोषणा करत नगरसेवक पदाचे प्रमाणपत्र प्रदान केले.
सातपूर : नाशिक मनपाच्या प्रभाग क्रमांक १० ड मधून बिनविरोध निवडून आलेल्या भाजपाच्या इंदूबाई सुदाम नागरे यांची सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी हेमांगी पाटील यांनी औपचारिक घोषणा करत नगरसेवक पदाचे प्रमाणपत्र प्रदान केले.
प्रभाग क्रमांक १० ड मधील भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक सुदाम नागरे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर २३ जून रोजी मतदान घेण्यात येणार होते. मात्र भाजपाने दिवंगत नगरसेवक सुदाम नागरे यांच्या पत्नी इंदूबाई नागरे यांना उमेदवारी जाहीर केल्याने या निवडणुकीकडे सहानुभूतीपूर्वक पाहिले गेले. त्यामुळे शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस, माकप, मनसे या पक्षांनी निवडणुकीत आपला उमेदवार उभा केला नाही. तर अपक्ष उमेदवार दत्तू वामन यांनी अखेरच्या क्षणी उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे पोटनिवडणुकीवर बिनविरोधाचे शिक्कामोर्तब झाले होते. यावेळी भाजपा प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, मनपा सभागृह नेते दिनकर पाटील, सातपूर प्रभाग सभापती योगेश शेवरे, नगरसेविका पल्लवी पाटील, माधुरी बोलकर, रवींद्र धिवरे, शशिकांत जाधव, विक्रम नागरे, निवृत्ती इंगोले, गणेश बोलकर, स्वप्नील पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
पदाधिकाऱ्यांकडून स्वागत
नाशिक मनपाच्या प्रभाग क्रमांक १० ड मधून बिनविरोध निवडून आलेल्या भाजपाच्या इंदूबाई सुदाम नागरे अधिकृत घोषणा २४ जून रोजी करण्यात येणार होती. त्या अनुषंगाने सोमवारी सकाळी सातपूर विभागीय कार्यालयातील सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी हेमांगी पाटील यांनी इंदूबाई नागरे यांची बिनविरोध निवड झाल्याची औपचारिक घोषणा करत प्रमाणपत्र प्रदान केले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.