बीए एलएलबी प्रवेशासाठी २१ एप्रिलला सीईटी परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 01:28 AM2019-04-17T01:28:39+5:302019-04-17T01:28:57+5:30

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे विधी शाखेच्या बारावीनंतर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी रविवारी (दि.२१) सीईटी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील एकूण ३६ आणि महाराष्ट्राबाहेरील १३ अशा एकूण ६६ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.

 CET Examination for BA LLB admission on April 21 | बीए एलएलबी प्रवेशासाठी २१ एप्रिलला सीईटी परीक्षा

बीए एलएलबी प्रवेशासाठी २१ एप्रिलला सीईटी परीक्षा

googlenewsNext

नाशिक : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे विधी शाखेच्या बारावीनंतर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी रविवारी (दि.२१) सीईटी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील एकूण ३६ आणि महाराष्ट्राबाहेरील १३ अशा एकूण ६६ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.
एलएलबी (३ वर्षे) व बी.ए. एलएलबी (५ वर्षे) या दोन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी अनिवार्य असून, प्रवेश परीक्षा न दिल्यास विधी अभ्यासक्रमासाठी प्रवेशास पात्र ठरू शकत नाही. बारावीनंतर बीए एलएलबी या पाच वर्षांच्या अभ्यासक्रमासाठीची प्रवेश परीक्षा रविवारी (दि. २१) होणार आहे. पदवीनंतर एलएलबी या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा ११ मे रोजी होणार असून, त्यासाठी आॅनलाइन अर्ज करण्याविषयीची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. आॅनलाइन अर्ज भरताना अडचणी येत असतील किंवा प्रवेश परीक्षेचे स्वरूप, प्रवेश परीक्षेनंतरची कार्यप्रणाली कशी असते, याबाबत माहिती मिळवण्यासाठी महासीईटीच्या या संकेतस्थळावर अर्ज प्रक्रिया व अधिक माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.
३० मे रोजी निकाल
आर्किटेक्चरसह हॉटेल मॅनेजमेंट या पदव्युत्तर शिक्षणक्रमांसाठी १८ मे रोजी सीईटी प्रवेश परीक्षा कक्षातर्फे मास्टर आॅफ आर्किटेक्चर व हॉटेल मॅनेजमेंट या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी १८ मे रोजी सीईटी होणार आहे. या परीक्षेचा निकाल ३० मे रोजी जाहीर होईल. प्रवेश परीक्षा न दिल्यास विद्यार्थी कोणत्याही प्रवेशास पात्र ठरू शकत नाही.

Web Title:  CET Examination for BA LLB admission on April 21

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.