सीईटीत नाशिकच्या विद्यार्थ्यांचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 01:19 AM2018-06-04T01:19:11+5:302018-06-04T01:19:11+5:30
नाशिक : अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषीपदवी अभ्यासक्र माच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षेचा निकाल रविवारी (दि.३) जाहीर झाला असून, यात नाशिकच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
नाशिक : अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषीपदवी अभ्यासक्र माच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षेचा निकाल रविवारी (दि.३) जाहीर झाला असून, यात नाशिकच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
नाशिक जिल्ह्यातून सुमारे २२ हजार ४०४ विद्यार्थी सीईटीसाठी प्रविष्ट झाले होते. तर विभागातून ४९ हजार ६०६ विद्यार्थ्यांंनी ही परीक्षा दिली होती. यात नाशिकच्या प्रथमेश फडके याने १७४ गुण मिळवले असून, मृणाल कोतकर (१७३), निसर्ग धामणे (१७०), निरज पंडित (१७०), सिद्धार्थ चोरडिया (१६५), भूपाली कमलास्कर (१६४), आदित्य मेधने (१५९), श्रृत कासलीवाल (१५९), गुंजन गुजराथी (१५९), धनंजय होके (१५६) ध्यानी व्यास (१५४), तेजस बनकर (१५३), अदित पाटील (१५२) प्रत्येंच्छा कुराडेने १५२ गुण मिळवले आहे. यावर्षीच्या एमएचसीईटीमध्ये अकरावी आणि बारावी या दोन्ही वर्गांच्या अभ्यासक्रमाचा समावेश असल्याने विद्यार्थ्यांना ही परीक्षा अधिक कठीण गेल्याने निकालात घसरण झाली असल्याचे बोलले जात आहे, परंतु वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचे सर्व लक्ष ‘नीट’वर केंद्रित केले होते. त्यामुळेही एमएचसीईटीच्या निकालात घट झाल्याचे मत दुसºया गटातून व्यक्त होत आहे. एमएचसीईटीसाठी निगेटीव्ह मार्किंग नसतानाही संपूर्ण राज्यातून परीक्षेस प्रविष्ट ४ लाख ३५ हजार विद्यार्थ्यांपैकी केवळ २२ हजार विद्यार्थ्यांना १०० पेक्षा अधिक गुण मिळाले असल्याने जेईईच्या तुलनेत सीईटीचा निकाल खालावला असल्याचे मत शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले. अभियांत्रिकी क्षेत्रातील ८५ टक्के जागा या सीईटीमार्फत भरल्या जाणार असून १५ टक्के जागा जेईई परीक्षेतील गुणांच्या आधारे पूर्ण करण्यात येणार आहेत.
विद्यार्थ्यांची लागली कसोटी
फिजिक्स, केमिस्ट्री व मॅथ्स (पीसीएम) आणि बायोलॉजी (पीसीबी) या दोन ग्रुपमध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. अकरावी व बारावी अभ्यासक्र मावर आधारित या परीक्षेची काठिण्य पातळी वाढल्याचे निकालाअंती दिसून आले. मॅथ्स व बायोलॉजी या विषयांच्या तुलनेत फिजिक्स आणि केमिस्ट्री या दोन्ही विषयांवरील बहुतांश प्रश्नांची काठिण्य पातळी जास्त असल्याने हा पेपर सोडवताना परीक्षार्थींची मोठी कसोटी लागली होती.