चाबहार बंदरामुळे भारताला आयातीला मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:14 AM2021-02-07T04:14:28+5:302021-02-07T04:14:28+5:30
अफगाण व भारतीय व्यापाऱ्यांसाठी असलेल्या संधी, आव्हाने आणि धोरणात्मक शिफारशी या विषयावर अफगाणिस्तानचे कॉन्सुल जनरल झाकिया वार्डाक यांच्यासमवेत महाराष्ट्र ...
अफगाण व भारतीय व्यापाऱ्यांसाठी असलेल्या संधी, आव्हाने आणि धोरणात्मक शिफारशी या विषयावर अफगाणिस्तानचे कॉन्सुल जनरल झाकिया वार्डाक यांच्यासमवेत महाराष्ट्र चेंबर व विविध चेंबरच्या प्रतिनिधींची बैठक झाली. झाकिया वार्डाक यांनी चाबहार बंदरात उपलब्ध असलेल्या संधीची माहिती देताना सांगितले की, भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान राजकीयदृष्ट्या शाश्वत कनेक्टिव्हिटीची स्थापना सुनिश्चित करेल. यामुळे या दोन्ही देशांमधील आर्थिक संबंध आणखी वाढतील. इराणमधील चाबहार पोर्ट भारत, इराण आणि अफगाणिस्तान यांच्यातील व्यापार, उद्योगसंबंध वाढीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. यावेळी महाराष्ट्र चेंबर्स अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी सांगितले, चाबहार बंदरामुळे भारत, रशिया, इराण, युरोप आणि मध्य आशिया यांना आयात- निर्यात करण्यासाठी चालना मिळेल. चाबहार बंदराच्या विकासामुळे भारताला तेलाच्या आयात किमतीतही चांगली घसरण दिसून येईल. आयएमसी चेंबरच्या शिपिंग अँन्ड लॉजिस्टिकसचे कमिटीचे चेअरमन मार्क एस. फर्नांडिस, ट्रान्स एशियन चेंबरचे समन्वयक संजय भिडे, आयसीआयबीचे अध्यक्ष मनप्रीत नेगी, एएमबीआयटीचे अध्यक्ष सिद्धार्थ रस्तोगी यांनीही आपले विचार मांडले. अब्दुल नफा सार्वरी यांनी आभार मानले.