ग्रामवन योजनेत चापडगावची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 02:31 PM2018-05-25T14:31:43+5:302018-05-25T14:31:43+5:30
नांदूरशिंगोटे -जंगलाचे संवर्धन व सरंक्षण व्हावे या दृष्टीने राज्य शासनाने ग्रामवन योजना सुरू केली आहे. सिन्नर तालुक्यातील चापडगांव या एकमेव गावची योजनेसाठी निवड झाली आहे. वनविभागाच्या ५७० हेक्टर जमिनीवर जंगलवाढीसाठी मृद व जलसंधारण तसेच वनसंवर्धनाचे कामे घेतली जाणार आहे
नांदूरशिंगोटे -जंगलाचे संवर्धन व सरंक्षण व्हावे या दृष्टीने राज्य शासनाने ग्रामवन योजना सुरू केली आहे. सिन्नर तालुक्यातील चापडगांव या एकमेव गावची योजनेसाठी निवड झाली आहे. वनविभागाच्या ५७० हेक्टर जमिनीवर जंगलवाढीसाठी मृद व जलसंधारण तसेच वनसंवर्धनाचे कामे घेतली जाणार आहे. ग्रामवन योजनेमुळे चापडगांव येथे विविध विकासकामांना गती मिळणार आहे.वनविभागाने दहा वर्षासाठी सुमारे पाच कोटी रु पयांचा आराखडा तयार केला आहे. ग्रामवन योजनेच्या माध्यमातून गावे सक्षम तथा स्वावलंबी करण्याचे प्रयत्न वन विभाग करीत आहे. या योजनेतून वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून गावात रोजगार निर्मितीचे प्रयत्न केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून वनविभागाच्या वतीने ग्रामवन योजना राबवली जात आहे. वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून गावात रोजगार निर्मितीला हातभार लावावा जाणार आहे.वन विभागाच्या माध्यमातून दहा गावांमध्ये अन्य कामेही लवकरच हाती घेतली जाणार आहेत. सदर कामे वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून ग्रामस्थांनाच करावयाची आहेत. यातून त्यांना रोजगार उपलब्ध होणार आहे. शिवाय अन्य कामांची संधी उपलब्ध होणार आहे. रोपवन तथा अन्य साधनांतून मिळणाऱ्या उत्पन्नातून ग्राम समृद्ध करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. ग्रामस्थांना गावातच रोजगार मिळावा तथा जंगलांचेही संवर्धन व्हावे म्हणून ही योजना शासनाकडून हाती घेण्यात आली आहे. या योजनेला बर्यापैकी प्रतिसाद मिळत असून प्राथमिक कामेही सुरू झाली आहेत.ग्रामवन योजनेसाठी जिल्ह्यातून चापडगांवची निवड झालेली आहे. योजनेच्या माध्यमातून गावात वृक्षलागवडीसाठी खड्डे खोदणे व लागवडीचे कामे करणे, समतल चर खोदणे, दगडी बांध बांधणे,आदी कामे केली जाणार आहे. चापडगांवच्या वनजमिनीत २० हेक्टर क्षेत्रावर रोपवन विकिसत केले जात आहे. २५ हेक्टरवर समतलचर खोदाईचे काम सुरू आहेत.तर सुमारे ४० हेक्टर क्षेत्रावर १५० च्या आसपास दगडी बांध घालून मृद व जलसंधारनाचे कामे सुरू आहे.ग्रामवन योजनेअंतर्गत २०१७-१८ या वर्षी १३ कोटी वृक्ष लागवड अंतर्गत २२ हजार वृक्ष लागवड उदिष्ट ठेवण्यात आले आहे. आमदार राजाभाऊ वाजे, नाशिक पश्चिमचे मुख्य वनसंरक्षक एस.व्ही.रामाराव, उपवनसंरक्षक श्रीमती टी.ब्यूला,सहाय्यक वनसंरक्षक टी.आर.मदगुल, वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर बोडके, वनव्यवस्थापन समतिीचे अध्यक्ष सुभाष आव्हाड, ,सिन्नर तालुका खरेदी विक्र ी संघाचे अध्यक्ष वसंत आव्हाड, वनपाल प्रितेश सरोदे, वनरक्षक के.आर.इरकर यांनी चापडगांव येथे जावून सुरु असलेल्या कामांची माहिती घेतली.