छगन भुजबळ यांना शिवीगाळ करणाऱ्याला संभाजीनगरमधून अटक; नाशिक पोलिसांची कारवाई

By अझहर शेख | Published: August 22, 2023 09:52 PM2023-08-22T21:52:27+5:302023-08-22T21:52:55+5:30

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी याप्रकरणी तत्काळ गुन्ह्याचा समांतर तपास करत संशयित कॉलरला ताब्यात घेण्याचे आदेश दिले.

Chagan Bhujbal abuser arrested from Sambhajinagar; Action of Nashik Police | छगन भुजबळ यांना शिवीगाळ करणाऱ्याला संभाजीनगरमधून अटक; नाशिक पोलिसांची कारवाई

छगन भुजबळ यांना शिवीगाळ करणाऱ्याला संभाजीनगरमधून अटक; नाशिक पोलिसांची कारवाई

googlenewsNext

नाशिक - राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना फोनद्वारे संपर्क साधून एका अज्ञात कॉलरने शिवीगाळ केल्याची घटना तीन दिवसांपुर्वी घडली होती. नाशिक शहर पोलिसांनी याप्रकरणी गंभीर दखल घेत मंगळवारी (दि.२२) अंबड पोलिस ठाण्यात अज्ञात कॉलरविरुद्ध गुन्हा नोंदविला. यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट-१च्या पथकाला माहिती मिळताच त्यांनी तपासाची चक्रे फिरवून कॅलर संशयीत इंद्रनील विभास कुलकर्णी (४४,रा.छत्रपती संभाजीनगर) यांना रात्री ताब्यात घेतले.

नाशिकमधील मखमलाबादमधील एका शाळेतील कार्यक्रमात छगन भुजबळ यांनी एका समाजाच्या भावना दुखविणारे वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावरून नवीन वादळ उभे राहिले. यानंतर भुजबळ यांना एका मोबाइल क्रमांकावरून थेट फोन आला व त्या कॉलरने त्यांना अश्लील भाषेचा वापर करत शिवीगाळ केली. यामुळे तो मोबाइल क्रमांकावरून राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास जगन्नाथ खैरे यांनी अंबड पोलीस ठाण्यत फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरून मंगळवारी १२वाजता पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी याप्रकरणी तत्काळ गुन्ह्याचा समांतर तपास करत संशयित कॉलरला ताब्यात घेण्याचे आदेश दिले. यानुसार गुन्हे शाखा युनीट-१चे वरिष्ठ पोलीस निरिक्षक विजय ढमाळ यांनी तपासाची चक्रे फिरवून संशयित कॉलरचा माग काढला आणि पथकासह छत्रपती संभाजीनगर गाठले. तेथून संशयित इंद्रनील कुलकर्णी यांना ताब्यात घेत पथक रात्री उशीरा नाशिकमध्ये पोहचले. त्यांची प्राथमिक चौकशी करून त्यांना पुढील तपासासाठी अंबड पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. संशयित कुलकर्णी यांचा छत्रपती संभाजीनगरमध्ये सोलरचा व्यवसाय असल्याचे सुत्रांकडून समजते.

Web Title: Chagan Bhujbal abuser arrested from Sambhajinagar; Action of Nashik Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.