‘जैन सोशल’च्या वतीने ‘चाय पे चर्चा’
By Admin | Published: February 9, 2016 11:22 PM2016-02-09T23:22:30+5:302016-02-09T23:23:33+5:30
‘जैन सोशल’च्या वतीने ‘चाय पे चर्चा’
नाशिक : सकारात्मक गोष्टींचा गुणाकार आणि नकारात्मक बाबींचा भागाकार यशाच्या मार्गाचे गणित सोडवायला मदत करतो. उद्योजकाला बदलत्या काळाचा मागोवा आणि आगामी भविष्यकाळाचा अंदाज घेता यायला हवा. स्पर्धा टाळता येणार नाही, मात्र त्यावर मात करूनच यशस्वी उद्योजक होता येते, असे प्रतिपादन उद्योजक श्रीरंग सारडा यांनी केले. जैन सोशल ग्रुप प्लॅटिनमतर्फेशनिवारी (दि.६) ‘चाय पे चर्चा’ या उपक्र माचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी सारडा बोलत होते. ‘टी विथ सक्सेसफूल पर्सनॅलिटी’ हे या उपक्रमाचे ब्रीदवाक्य असून, या उपक्रमातील शृंखलेतील पहिले पुष्प उद्योजक श्रीरंग सारडा यांनी गुंफले.
उद्योजकाकडे सकारात्मक विचार हवा. पैसा हेच ध्येय व जीवनातले सर्वस्व नसले तरी पैशाची निर्मिती उद्योगातूनच होते. व्यवसायवृद्धी होऊन तो शिखरावर नेण्यात अनेक घटकांचा वाटा असतो. चांगल्या संधी आपोआप येत नाहीत त्या निर्माण कराव्या लागतात. अनेक गोष्टी केवळ गृहीत धरणे चुकीचे असून, संधीचे सोने करता आले पाहिजे. प्रत्येक गोष्टीचे मूल्य जाणून घेता यायला हवे. स्वत:शी प्रामाणिक राहून पैसा निर्माण केला तर तो वाढविता येतो, असे सारडा यांनी यावेळी सांगितले.
यावेळी संस्थेचे सचिव राहुल पारख यांनी संकल्पना विशद केली. अध्यक्ष सतीश हिरण यांनी स्वागत केले. यावेळी तरुण उद्योजक आनंद मुथा, तेजपाल बोरा, आनंद कोठारी, मनिष बोथरा, सुनील बाफणा, सुनील कोठारी, आशिष साखला, प्रितीश चोपडा आदि उपस्थित
होते. (प्रतिनिधी)