‘रासाका’ सुरू करण्याच्या मागणीसाठी दुसऱ्या दिवशीही साखळी उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:36 AM2020-12-04T04:36:26+5:302020-12-04T04:36:26+5:30
मंगळवारी या साखळी उपोषणास प्रारंभ करण्यात आला. साखळी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी सुयोग गिते, ...
मंगळवारी या साखळी उपोषणास प्रारंभ करण्यात आला. साखळी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी सुयोग गिते, मनोज जाधव, धनंजय डुंबरे, हेमंत सानप या रासाका बचाव कृती समितीच्या चार कार्यकर्त्यांनी साखळी उपोषण केले. निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली व तुमच्या मागण्यांचे निवेदन संबंधितांकडे पाठवले असून, त्याबाबत खुलासा येईल. त्यामुळे उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन केले.
रानवड कारखाना सुरू करण्याबाबत ठोस निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत आम्ही साखळी उपोषण मागे घेणार नसल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले. याप्रसंगी पोलीस निरीक्षक रंगराव सानप उपस्थित होते. भारतीय ट्रेण्ड युनियन केंद्राचे बंडू बागुल व इतर मान्यवरांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन पाठिंबा दिला.
===Photopath===
021220\02nsk_33_02122020_13.jpg
===Caption===
निफाड येथे उपोषणकर्त्याची भेट घेऊन चर्चा करताना तहसीलदार शरद घोरपडे. सोबत नामदेव शिंदे, सुयोग गीते, मनोज जाधव, धनंजय डुंबरे, हेमंत सानप, अजित सानप , दत्तू मुरकुटे, सचिन वाघ आदी.०२ निफाड १