रासाकासाठी तिसऱ्या दिवशी साखळी उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 08:22 PM2020-12-03T20:22:04+5:302020-12-04T01:08:05+5:30

निफाड : रानवड साखर कारखाना चालू करण्यासाठी शासनाने तात्काळ निविदा काढावी आणि रासाका सुरू करावा या मागणीसाठी रासाका बचाव कृती समितीतर्फे निफाड तहसील समोर गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी साखळी उपोषण करण्यात आले.

Chain fast on the third day for Rasaka | रासाकासाठी तिसऱ्या दिवशी साखळी उपोषण

रासाकासाठी तिसऱ्या दिवशी साखळी उपोषण

Next
ठळक मुद्देरासाका बचाव कृती समितीच्या ४ कार्यकर्त्यांनी साखळी उपोषण

निफाड : रानवड साखर कारखाना चालू करण्यासाठी शासनाने तात्काळ निविदा काढावी आणि रासाका सुरू करावा या मागणीसाठी रासाका बचाव कृती समितीतर्फे निफाड तहसील समोर गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी साखळी उपोषण करण्यात आले.

मंगळवार (दि.१) पासून या साखळी उपोषणास प्रारंभ करण्यात आला. तिसऱ्या दिवशी बाबुराव सानप, भाऊसाहेब मत्सागर, गोकुळ कुंदे, अनिल शिंदे या रासाका बचाव कृती समितीच्या ४ कार्यकर्त्यांनी साखळी उपोषण केले. दररोज रासाका बचाव कृती समिती ४ कार्यकर्ते या साखळी उपोषणात सामील होत आहेत.
गुरुवारी (दि.४) धनंजय जाधव, दिगंबर गीते, राजेंद्र मोगल, मधुकर शेलार, गुणवंत होळकर, प्रकाश अडसरे, सतीश मोरे, विकास चांदर, तुकाराम गांगुर्डे, संजय गाजरे, जगदीश पाटील, बाळासाहेब पुंड, साहेबराव ढोमसे, सचिन धारराव, संजय गाजरे, योगेश रायते आदी मान्यवरांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली.

Web Title: Chain fast on the third day for Rasaka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.