चोरीचे दागिणे घेणाऱ्या सराफाला बेड्या; तीन सराईत गुन्हेगारांच्या बांधल्या मुसक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 06:09 PM2019-05-20T18:09:29+5:302019-05-20T18:10:30+5:30

सर्वाधिक मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे केल्याचे तपासात उघड झाले आहे. सोनसाखळीचोरीसह लूटीचे मुंबईनाका पोलीस ठाणे हद्दीत ७, इंदिरानगर पोलिस ठाणे हद्दीतील चार, गंगापूर, उपनगर पोलीस ठाणे हद्दीत प्रत्येकी २, अंबड, आडगाव, पंचवटी या पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक असे एकूण १८ गुन्हे उगडकीस

Chains grabbing stolen jewelery; Three Indian criminals arrested | चोरीचे दागिणे घेणाऱ्या सराफाला बेड्या; तीन सराईत गुन्हेगारांच्या बांधल्या मुसक्या

चोरीचे दागिणे घेणाऱ्या सराफाला बेड्या; तीन सराईत गुन्हेगारांच्या बांधल्या मुसक्या

Next
ठळक मुद्दे योगेश हा सराईत गुन्हेगार

नाशिक : शहर व परिसरात सोनसाखळी हिसकावून पळ काढण्याच्या घटना सुरू असताना मुंबईनाका गुन्हे शोध पथकाला अट्टल सोनसाखळी, मोबाईल हिसकावणा-याचोरांच्या मुसक्या आवळण्यास यश आले आहे. तसेच गुन्हेगारांकडून चोरीचे दागिणे घेणा-या एका सराफ व्यावसायिकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून चोरीच्या २९८ग्रॅमच्या सोन्याच्या लगडींसह दागिणे असा  ९लाखचा मुद्देमाल जप्त केला आहे.

महिनाभरापासून शहरात सोनसाखळी चोरीसारख्या जबरी लूटीच्या घटना वाढल्या होत्या. मुंबईनाका पोलीस ठाणे हद्दीत वडाळारोडवर नासर्डीपूलालगत एका पादचा-याला चाकूचा धाक दाखवून लूटल्याची घटना बुधवारी (दि.१५) घडली होती. या घटनेत फिर्यादीने मुंबईनाका पोलिसांकडे तक्रार दिली होती. वरिष्ठ पोलीस निरिक्षक विजय ढमाळ यांनी याप्रकरणी गुन्हे शोध पथकाला तातडीने फिर्यादीने संशयितांचे वर्णन सांगितले. त्यानुसार रात्रगस्तीवर असलेले गुन्हे शोध पथकाचे हवालदार मधुकर घुगे, दिपक वाघ, भाऊसाहेब नागरे यांनी मुंबईनाका, शिवाजीवाडी, गोविंदनगर या भागात संशयितांचा शोध सुरू केला. यावेळी एक अल्पवयीन संशयित घुगे यांच्या हाती लागला. पोलिसांना त्याच्यावर संशय बळावल्याने त्यास पोलीस ठाण्यात आणून कसून चौकशी केली असता त्याने सराईत गुन्हेगार योगेश दामू कडाळे (२१), कैलास हरी भांगरे (१८), अंकुश सुरेश निकाळजे (१९) या तीघांची नावे सांगितली. यांच्या मदतीने परिसरात लूटमारीचे गुन्हे करत असल्याचा सुगावा पोलिसांना लागला. अल्पवयीन गुन्हेगारावरही यापुर्वी घरफोडीचा गुन्हा दाखल असल्याचे तपासात पुढे आले आहे. तसेच योगेश हा सराईत गुन्हेगार असून सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत त्याच्यावर सोनसाखळी चोरीसारखे नऊ गुन्हे दाखल आहेत. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत योगेश हा अल्पवयीन मुलांच्या मदतीने गुन्हे करत होता. चेहरा झाकलेला व दुचाकीचा क्रमांक अस्पष्ट असल्याने फिर्यादी महिलांना त्याचे वर्णन सांगणे अवघड होत होते; त्यामुळे योगेश पोलिसांना चकवा देत गुन्हेगारी करत होता. त्याची ‘खाकी’च्या शैलीत चौकशी केली असता तब्बल १८ गुन्हे उघडकीस आले असून सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये लंपास केलेल्या मुद्देमालापैकी ८ लाख ९२ हजारांचा मुद्देमाल धारधार चाकू जप्त केल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सर्वाधिक गुन्हे मुंबईनाका हद्दीत
सर्वाधिक मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे केल्याचे तपासात उघड झाले आहे. सोनसाखळीचोरीसह लूटीचे मुंबईनाका पोलीस ठाणे हद्दीत ७, इंदिरानगर पोलिस ठाणे हद्दीतील चार, गंगापूर, उपनगर पोलीस ठाणे हद्दीत प्रत्येकी २, अंबड, आडगाव, पंचवटी या पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक असे एकूण १८ गुन्हे उगडकीस आले आहेत. सराईत योगेशविरूध्द सरकारवाडा पोलीस ठाण्यात नऊ गुन्हे दाखल असून ते गुन्हेही उघडकीस येण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Chains grabbing stolen jewelery; Three Indian criminals arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.