सभापती, उपसभापती बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 12:56 AM2017-07-25T00:56:57+5:302017-07-25T00:57:09+5:30

नाशिक : महापालिकेच्या विधी, आरोग्य व वैद्यकीय सहायक आणि शहर सुधारणा समित्यांच्या सभापती-उपसभापतिपदासाठी बिनविरोध निवड झाली आहे.

Chairman, Vice Chairman | सभापती, उपसभापती बिनविरोध

सभापती, उपसभापती बिनविरोध

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : महापालिकेच्या विधी, आरोग्य व वैद्यकीय सहायक आणि शहर सुधारणा समित्यांच्या सभापती-उपसभापतिपदासाठी बिनविरोध निवड झाली आहे. तीनही समित्यांवर भाजपाचे सभापती विराजमान झाले, तर आरोग्य समितीचे उपसभापतिपद योगेश शेवरे यांना बहाल केल्याने त्यानिमित्ताने मनसेही सत्तेत सहभागी झाली आहे.
महापालिकेच्या तीनही विषय समित्यांच्या सभापती-उपसभापतिपदाकरिता अपर आयुक्त जोतिबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. विधी समितीच्या सभापतिपदी भाजपाच्या शीतल माळोदे, तर उपसभापतिपदी राकेश दोंदे तसेच शहर सुधार समितीच्या सभापतिपदी भाजपाचे भगवान दोंदे व उपसभापतिपदी स्वाती भामरे यांचाच एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. आरोग्य व वैद्यकीय सहायक समितीच्या सभापतिपदी भाजपाचे
ज्येष्ठ नगरसेवक सतीश कुलकर्णी यांचाच एकमेव अर्ज होता. त्यामुळे त्यांचीही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
दरम्यान, आरोग्य व वैद्यकीय समितीच्या उपसभापतिपदाकरिता मनसेचे योगेश शेवरे व भाजपाच्या शांता हिरे यांनी अर्ज दाखल केले होते. परंतु, शांता हिरे यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने मनसेचे योगेश शेवरे यांचीही बिनविरोध निवड झाली. तीनही विषय समित्यांचे सभापती व उपसभापती यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांचा महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, उपमहापौर प्रथमेश गिते यांनी सत्कार केला.  यावेळी, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, सभागृहनेता दिनकर पाटील, भाजपा गटनेता संभाजी मोरुस्कर, माजी आमदार वसंत गिते आदी उपस्थित होते.
माळोदे-दोंदे यांची उशिराने एण्ट्री
सुरुवातीला विधी समितीच्या सभापती व उपसभापतिपदाकरिता निवडणूक प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली. सकाळी १०.३० वाजता प्रक्रिया सुरू होऊनही सभापतिपदाच्या उमेदवार शीतल माळोदे व उपसभापतिपदाचे उमेदवार राकेश दोंदे हे उपस्थित झाले नव्हते.
अखेर भाजपातच धावपळ उडाली आणि दोहोंना दूरध्वनी करत बोलावून घेण्यात आले. दोहोंची ११.१५ वाजता महापालिकेत एण्ट्री झाल्यानंतर प्रक्रिया पूर्ण झाली. दरम्यान, निवडणुकीप्रसंगी सेनेचेही मोजकेच सदस्य उपस्थित होते.

 

Web Title: Chairman, Vice Chairman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.