सभापतिपदासाठी सेना-भाजपात लढत

By admin | Published: January 5, 2017 10:56 PM2017-01-05T22:56:44+5:302017-01-05T23:10:25+5:30

मालेगाव पंचायत समिती : वडनेर, झोडगे, सौंदाणे गणात होणार चुरस

For the chairmanship of the army and the BJP | सभापतिपदासाठी सेना-भाजपात लढत

सभापतिपदासाठी सेना-भाजपात लढत

Next

मालेगाव : आगामी मालेगाव पंचायत समिती निवडणुकीसाठी सभापतिपदाचे आरक्षण सर्वसाधारण स्त्री जागेसाठी आरक्षित झाले आहे. यामुळे सर्वसाधारण स्त्री आरक्षण असलेल्या वडनेर, सौंदाणे, झोडगे या तिनही गणात चुरशीची लढत होणार आहे. शिवसेना, भाजपामध्येच खरा सामना होण्याची चिन्हे दिसत आहेत.
विद्यमान सभापती भरत पवार यांचा सौंदाणे गण, विद्यमान जि. प. सदस्य सौ. स्वाती ठाकरे यांच्या गटातील वडनेर गण, शिवसेनेचे विद्यमान जि. प. सदस्य ज्योती तलवारे यांच्ोा झोडगे गटातील झोडगे गणही सर्वसाधारण स्त्रीसाठी राखीव झाल्याने या तिनही गणांमध्ये सत्ता टिकविण्यासाठी अस्तित्वाची लढाई होणार आहे.
मालेगाव तालुक्यात सात गट व १४ गण आहेत. तालुक्यातील करंजगव्हाण, डोंगराळे, कळवाडी, चिखलओहोळ, वडेल, रावळगाव, दाभाडी, पाटणे, चंदनपुरी, निमगाव, जळगाव (निं.) या गणांमध्ये वेगवेगळे आरक्षण आहे तर सभापतीपदासाठी लागणारे आरक्षण वडनेर, सौंदाणे, झोडगे या गणात आहे. त्यामुळे या तिनही गणांमध्ये इच्छुकांची संख्या अधिक असणार आहे. सेनेचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, भाजपाचे हिरे, जिल्हाध्यक्ष दादा जाधव यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. सौंदाणे गणात शिवसेनेतर्फे विद्यमान सभापती भरत पवार यांच्या पत्नी सुनिता पवार, शारदा पवार, शेतकरी संघाच्या माजी संचालिका वैशाली पवार, माजी सभापती वंदना पवार, सविता बच्छाव, मनिषा सोनवणे, भाजपातर्फे माजी जि. प. सदस्य रत्नाकर पवार यांच्या भावजयी स्वाती पवार, माजी पं. स. सदस्य पंकज शेवाळे यांच्या पत्नी जयश्री शेवाळे, वऱ्हाणेच्या सरपंच संगीता पवार इच्छूक आहेत.
झोडगे गणात शिवसेनेतर्फे विद्यमान जि. प. सदस्य ज्योती तलवारे, माजी सरपंच दिपक देसले यांच्या पत्नी ज्योती देसले, रंजना देसले तर भाजपाकडून सुवर्णा देसाई, सुरेखा उज्जन, सुप्रिया देवरे इच्छुक आहेत.
वडनेर गणात विद्यमान जि. प. सदस्य स्वाती ठाकरे, अजिंक्य ठाकूर यांच्या पत्नी या भाजपाकडून
तर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र ठाकरे यांच्या पत्नी, शिवसेनेकडून कृष्णा ठाकरे यांच्या आई इच्छुक आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: For the chairmanship of the army and the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.