लासलगाव  बाजार समितीत  नाफेडच्या कांदा खरेदीने चैतन्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:12 AM2018-04-24T00:12:03+5:302018-04-24T00:12:03+5:30

येथील बाजार समितीत नाफेडच्या कांदा खरेदीचा शुभारंभ नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. बाजार समितीत खरेदी केलेल्या पहिल्या कांदा ट्रॅक्टरचे पूजन नाफेड संकुलात खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष शांताराम नागरे यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला.

 Chaitanya by buying Nafed onion in the Lasalgaon Market Committee | लासलगाव  बाजार समितीत  नाफेडच्या कांदा खरेदीने चैतन्य

लासलगाव  बाजार समितीत  नाफेडच्या कांदा खरेदीने चैतन्य

Next

लासलगाव : येथील बाजार समितीत नाफेडच्या कांदा खरेदीचा शुभारंभ नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. बाजार समितीत खरेदी केलेल्या पहिल्या कांदा ट्रॅक्टरचे पूजन नाफेड संकुलात खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष शांताराम नागरे यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला. यावेळी संचालक जनार्दन जगताप, अनिल घोटेकर, सुरेश रायते, शंकरराव कुटे, प्रकाश कापडी, शिवाजी जाधव, धोंडीराम धाकराव, मधुकर दरेकर, राजाराम दरेकर, संघाचे व्यवस्थापक प्रकाश भालेराव, नाफेडचे वरिष्ठ सहायक पी. के. चौबे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. या कांदा खरेदीसाठी लासलगाव खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून खरेदी-विक्रीची व्यवस्था पाहिली जाणार आहे. नाफेडच्या या कांदा खरेदीमुळे बाजारभावात सुमारे २०० ते २५० रुपये वाढ दिसून आली. दि. २० रोजी ६०० ते ६५० रुपये क्विंटलने विकला जाणारा कांदा नाफेडच्या आगमनाने ८०० रुपये क्विंटलवर पोहचला. शेतमालाचे भाव पडल्यावर केंद्र सरकारच्या वतीने किंमत स्थिरीकरण कोशातून शेतमाल खरेदी करण्याची योजना सरकार राबवत असते. सदरची कांदा खरेदी या योजनेंतर्गत होत असल्याची माहिती पाटील यांनी यावेळी  दिली.  पुढील सहा महिन्यांच्या काळात कांद्याचा हंगाम नसल्याने हा कांदा साठवणूक करून आगामी काळात मोठ्या शहरांत विक्र ी करण्यात येणार आहे. उच्च प्रतीचा कांदा प्रचलित बाजारभावात सर्वोच्च दराने खरेदी करण्याचे आदेश केंद्र सरकारकडून दिले गेले असल्याची माहिती नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी यावेळी दिली. सदर कांदा विक्र ीचे पैसे शेतकऱ्यांना तत्काळ धनादेशाद्वारे देण्यात येणार आहेत. आजच्या प्रारंभीचा ट्रॅक्टर महेश दामू घोरपडे (रा. पाटोदा) यांच्या मालकीचा कांदा ७७० रुपये प्रतिक्विंटल या दराने खरेदी करण्यात आला.  सकाळच्या सत्रामध्ये ८१० रु पये प्रतिक्विंटल भावाने कांदा खरेदी केला गेला. 
दिलासा
कांद्याला मिळणाºया अत्यल्प भावामुळे हैराण झालेल्या शेतकºयाला नाफेडच्या कांदा खरेदीने दिलासा मिळणार आहे. लासलगाव येथील नाफेड संकुलात सुमारे पंधरा हजार मेट्रिक टन कांदा साठवणुकीची व्यवस्था आहे. याशिवाय राष्ट्रीय बागवानी संघ यांच्याकडे सुमारे एक हजार मेट्रिक टन कांदा साठवला जाऊ शकतो. यावर्षी कांद्याचे उत्पादन भरपूर असल्यामुळे पिंपळगाव, कळवण आदी ठिकाणीही नाफेडच्या वतीने कांदा खरेदी करण्यात येणार आहे. सरकारने कांद्याचे भाव सुधारावेत म्हणून हे पाऊल उचलले आहे. सध्या उन्हाळ कांद्याचा काढणी हंगाम सुरू आहे.

Web Title:  Chaitanya by buying Nafed onion in the Lasalgaon Market Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :onionकांदा