चैतन्य पर्वास प्रारंभ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 12:33 AM2017-08-26T00:33:24+5:302017-08-26T00:33:29+5:30

‘देवा घरा आला, भक्ती सन्माने पुजिला’ याची प्रचिती शुक्रवारी (दि.२५) घरोघरी बाप्पांच्या आगमनामुळे आली. विघ्नविनाशक सुखकर्ता गणरायाचे ढोल-ताशांच्या गजरात शहरभर जल्लोषात स्वागत होत असतानाच वरुणराजानेही हजेरी लावत अभिषेक केला. सार्वजनिक मंडळांसह घरोघरी बाप्पांची विधीवत प्राणप्रतिष्ठा होत पुढील ११ दिवसांसाठी एका चैतन्य पर्वास दिमाखात प्रारंभ झाला.

 Chaitanya Prahova start! | चैतन्य पर्वास प्रारंभ !

चैतन्य पर्वास प्रारंभ !

Next

नाशिक : ‘देवा घरा आला, भक्ती सन्माने पुजिला’ याची प्रचिती शुक्रवारी (दि.२५) घरोघरी बाप्पांच्या आगमनामुळे आली. विघ्नविनाशक सुखकर्ता गणरायाचे ढोल-ताशांच्या गजरात शहरभर जल्लोषात स्वागत होत असतानाच वरुणराजानेही हजेरी लावत अभिषेक केला. सार्वजनिक मंडळांसह घरोघरी बाप्पांची विधीवत प्राणप्रतिष्ठा होत पुढील ११ दिवसांसाठी एका चैतन्य पर्वास दिमाखात प्रारंभ झाला. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला शुक्रवारी घरोघरी बाप्पांची विधीवत प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी बाह्य मुहूर्तापासूनच गणेशभक्तांची लगबग सुरू झाली. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत बाप्पांच्या स्वागताची तयारी केली गेली होतीच. श्री गणेश पूजन मध्यान्हव्यापिनी असल्याने सूर्यादयापासून माध्यान्हापर्यंत म्हणजे दुपारी दीड वाजेपर्यंत बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करण्याचा मुहूर्त असला तरी सायंकाळपर्यंत पूजाविधी सुरू होता. शहरात ठिकठिकाणी थाटलेल्या गणेशमूर्तीच्या स्टॉल्समध्ये गणेशभक्तांची वर्दळ होती. सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी ढोलपथकांच्या माध्यमातून वाजत-गाजत, मिरवत बाप्पांचे जल्लोषात स्वागत केले, तर घरोघरी ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजराने चैतन्य संचारले होते. बाप्पांच्या आगमनाचा आनंदोत्सव सुरू असतानाच अधूनमधून वरुणराजानेही हजेरी लावत बाप्पांवर अभिषेक घातला. शहरातील मानाचे गणपती असलेले रविवार कारंजावरील श्री सिद्धिविनायक गणपती, भद्रकालीतील साक्षी गणेश, गंगापूररोडवरील नवशा गणपती, अशोकस्तंभवरील ढोल्या गणपती, मेनरोडवरील गणपती या ठिकाणीही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
पूजा साहित्याचा बाजार फुलला
श्रींच्या पूजेसाठी लागणाºया साहित्याचीही दुकाने शहरात चौकाचौकांत थाटलेली होती. प्रामुख्याने, बाप्पांसाठी लागणाºया पूजापत्री, कमळपुष्प, नारळ, बेल-दुर्वा, तुळशीपत्र, खारीक-सुपाºया आदी साहित्य खरेदीसाठी गणेशभक्तांची लगबग दिसून आली. फुलांनाही मोठी मागणी वाढल्याने भावही वधारले. एरवी दहा रुपयांमध्ये विक्री होणारा गुलाबफुलांचा गुच्छ ८० ते १०० रुपये डझनावरी विकला गेला, तर गणरायाचे आवडते फूल असलेल्या जास्वंदीलाही प्रचंड मागणी होती. नारळाचाही दर २५ ते ३० रुपये होता. गणेशपूजनासाठी पाच फळं लागत असल्याने फळांची बाजारपेठही खरेदीदारांच्या गर्दीने फुलली होती.
गुरुजींचे नेटवर्क जाम
पंचांगकर्त्यांनी गणेशपूजनासाठी भद्रा वर्ज्य नसल्याचे स्पष्ट केले असले तरी अनेकांनी श्री गणेशपूजन माध्यान्हापर्यंत दुपारी १.३९ वाजेपर्यंतच करावे, असे म्हटल्याने मुहूर्तावर प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी गुरुजींना मागणी वाढली होती. त्यामुळे गुरुजींचे नेटवर्क जाम राहिले. अनेकांनी ब्राह्म मुहूर्तावरच विधीवत प्राणप्रतिष्ठा केली. काही सार्वजनिक मंडळांकडून मात्र रात्री उशिरापर्यंत प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू होता. त्यानिमित्त धार्मिक विधी, श्लोक पठणाचेही कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

Web Title:  Chaitanya Prahova start!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.