चैत्री पौर्णिमेला गड सुना-सुना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:16 AM2021-04-28T04:16:30+5:302021-04-28T04:16:30+5:30
मागील वर्षीही कोरोनामुळे चैत्री पौर्णिमेची यात्रा रद्द करण्यात आली होती. सलग दुसऱ्या वर्षी ही यात्रा रद्द झाल्याने भाविकांचा हिरमोड ...
मागील वर्षीही कोरोनामुळे चैत्री पौर्णिमेची यात्रा रद्द करण्यात आली होती. सलग दुसऱ्या वर्षी ही यात्रा रद्द झाल्याने भाविकांचा हिरमोड झाला. या वर्षीदेखील मंदिरे बंद असल्यामुळेच ठराविक पुजाऱ्यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करून चैत्रोत्सव साजरा करण्यात आला. चैत्री पौर्णिमेला लाखोंच्या संख्येने राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक सप्तशृंगगडावर दाखल होत असतात. खान्देशातून दोन ते तीन लाख भाविक पदयात्रेत येत असतात तीपण दुसऱ्या वर्षीही खंडित झाली. सप्तशृंगीचा वर्षभरातील एक प्रमुख उत्सव असलेला चैत्रोत्सव यंदा २१ ते २७ एप्रिल होता. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या चैत्रोत्सवाच्या उत्साहावर पाणी फिरले. याशिवाय, मुबंई, पुणे, नाशिक, गुजरात, मध्यप्रदेश, याठिकाणाहून तृतीय पंथीयांचा छबिना बघण्यासाठीही लाखो भाविक या दिवशी हजेरी लावत असतात; परतु कोरोनामुळे यंदा गडावर शुकशुकाट पाहायला मिळाला.
फोटो- २७ सप्तशृंगी गड-१
दरवर्षी होणारा चैत्रोत्सव कोरोनामुळे यंदाही रद्द करण्यात आल्याने गडावर शुकशुकाट होता. ग्रामपंचायतीकडून मात्र वेळोवेळी निर्बंधांबाबत सजग करण्यात येत होते.
===Photopath===
270421\27nsk_41_27042021_13.jpg
===Caption===
फोटो- २७ सप्तशृंगी गड-१दरवर्षी होणारा चैत्रोत्सव कोरोनामुळे यंदाही रद्द करण्यात आल्याने गडावर शुकशुकाट होता. ग्रामपंचायतीकडून मात्र वेळोवेळी निर्बंधांबाबत सजग करण्यात येत होते.